आता `टू जी`, `थ्री जी`चा नाही तर `4जी`चा जमाना

Last Updated: Thursday, June 19, 2014, 10:06

रिलायन्स इंडस्ट्रीजने बुधवारी घोषित केले आहे की, पुढील तीन वर्षांत 1.8 लाख कोटींची बाजारात गुंतवणूक करणार आहे. तसेच आपली बहुप्रतीक्षित 4जी ब्रॉडबॅंड सेवा 2015पर्यंत सुरु करणार आहे.

मायक्रोसॉफ्टमधून गेट्‌स होणार पायउतार?

Last Updated: Wednesday, October 2, 2013, 13:42

मायक्रोसॉफ्टमध्ये गुंतवणूक करणाऱ्या तीन गुंतवणूकदारांनी बिल गेट्स यांची व्यवस्थापन समितीमधून गच्छंती करावी अशी मागणी केलीय. त्यामुळं कंपनीचे सहसंस्थापक अध्यक्ष बिल गेट्स यांना पायउतार व्हावं लागल्याची शक्यता आहे.

गुंतवणूक कंपनीने केली लोकांची करोडोंची फसवणूक

Last Updated: Tuesday, September 17, 2013, 20:38

नागपुरातल्या श्री सुर्या कंपनीनं हजारो गुंतवणुकदारांची फसवणूक केलीय. दाम दुप्पट करण्याचे आमिष दाखवत हि कंपनी सर्व सामान्य नागरिकांकडून गुंतवणुकीच्या सबबीखाली पैसे घेत होती. केवळ नागपुरातच नाही तर विदर्भातल्या अन्य जिल्ह्यातल्या नागरिकांचीही या कंपनीनं फसवणूक केलीय.

`वाईन`च्या विदेशी गुंतवणुकीला खड्ड्यांचं `बुच`!

Last Updated: Monday, August 5, 2013, 19:14

वाईन कॅपिटल अशी नाशिकची ओळख..... मात्र नाशिकचे रस्ते हा प्रयत्न हाणून पाडत आहेत. रस्त्यांसारख्या मुलभूत सोयी नसल्यानं विदेशी गुंतवणुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. सध्या नाशिकमध्ये असंच घडतंय.....

`टेलिकॉम` क्षेत्रात १०० टक्के `एफडीआय`ला परवानगी

Last Updated: Wednesday, July 17, 2013, 10:14

ढासळत चाललेल्या अर्थव्यवस्थेला टेकू देण्यासाठी केंद्र सरकारनं एक साहसी पाऊल उचलंलय. दूरसंचार अर्थात टेलिकॉम क्षेत्रात सरकारनं १०० टक्के विदेशी गुंतवणूक (एफडीआय)ला परवानगी दिलीय.

‘सोन्यात गुंतवणूक कमी करा’

Last Updated: Thursday, June 13, 2013, 16:57

डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत दिवसेंदिवस ढासळत चालल्यानं शेवटी वित्तमंत्री पी. चिंदबरम यांनी नागरिकांना दिलासा देण्यासाठी अर्थव्यवस्था स्थिर असल्याचं सांगितलंय. याचवेळी त्यांनी सोन्यात गुंतवणूक करू नका असा सल्लाही दिलाय.

पाकिस्तानी बँकांच्या शाखा उघडणार भारतात!

Last Updated: Wednesday, May 29, 2013, 19:47

पाकिस्तानातील राष्ट्रीय बँकांपैकी दोन बँकांना भारतात आपल्या शाखा उघडण्याची परवानगी मिळाली आहे. पाकिस्तानला भारतात गुंतवणूक करण्याची परवानगी मिळाल्यानंतर या बँकांना परवानगी मिळाली आहे.

फसवणूक करणाऱ्या भामट्यांना शिवसैनिकांचा चोप

Last Updated: Monday, March 4, 2013, 22:25

कमी पैशात सोने देण्याचा बहाणा करुन लोकांची फसवणूक करणा-या दोन भामट्यांना कोल्हापूरातील शिवसेना कार्यकर्त्यांनी चोप दिलाय.

'एफडीआय'साठी महाराष्ट्र ‘हॉट डेस्टिनेशन’!

Last Updated: Tuesday, January 8, 2013, 13:25

भारतातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र ‘एफडीआय’ म्हणजेच थेट परकीय गुंतवणुकीसाठीही हॉट डेस्टिनेशन ठरलाय. एप्रिल २००० ते ऑक्टोबर २०१२ या काळात महाराष्ट्रात सर्वाधिक म्हणजे ६१.१३ अब्ज डॉलर एवढी परकीय गुंतवणुक नोंदविण्यात आलीय.

अन् नारायण राणे चिडले...

Last Updated: Thursday, January 3, 2013, 20:05

उद्योग मंत्री नारायण राणे यांनी आज औद्योगिक धोरणाबद्दल घेतलेल्या पत्रकार परिषदेत पत्रकार आणि राणे यांच्या चांगली शाब्दिक बाचाबाची झाली.

सेझच्या जमिनी गृहप्रकल्पांसाठी नाहीत - राणे

Last Updated: Thursday, January 3, 2013, 16:28

राज्याच्या नव्या औद्योगिक धोरणात सेझची जमीन गृहप्रकल्पांना देण्याची कुठलीही तरतूद नसल्याचं औद्योगिक मंत्री नारायण राणे यांनी स्पष्ट केलंय.

OMG – ओह माय गोल्ड

Last Updated: Tuesday, November 27, 2012, 21:14

येत्या काही महिन्यात तुमच्या घरी लग्नकार्य किंवा अन्य कारणांसाठी दागिने तयार केले जाणार असतील तर जास्त काळ वाट पाहण्यात काहीच अर्थ नाही..काहींच्या मते आगामी काळात सोन्याचे भाव वाढण्याची शक्यता आहे..

...तर, भारत सेल्समनचा देश बनेल- जेटली

Last Updated: Sunday, September 16, 2012, 18:21

किरकोळ व्यापार क्षेत्रात विदेशी गुंतवणुकीच्या निर्णयावर सध्या पूर्ण देशभरात चर्चा सुरू आहे. विदेशी गुंतवणुकीत ५१ टक्के वाढ केल्याने सामान्य जनतेत आणि राजकीय पक्षांमध्ये खळबळ उडाली आहे. भाजपा नेते अरूण जेटली यांनी विदेशी गुंतवणुकीसंदर्भात बोलताना निवेदन केलं, की विदेशी गुंतवणुकीला परवानगी मिळाल्यास भारत ‘सेल्सबॉइज’ किंवा ‘सेल्सगर्ल्स’चा देश बनेल.

`एम फॅक्टर`मुळे सरकार अडचणीत...

Last Updated: Saturday, September 15, 2012, 18:54

यूपीए सरकारसमोर चार ‘एम’ संकट म्हणून उभे ठाकलेत. मायावती, ममता, मुलायम आणि एम. करूणानिधींनी डिझेलची दरवाढ आणि एफडीआयला विरोध केलाय.

पाकला भारतात थेट गुंतवणुकीची परवानगी

Last Updated: Thursday, August 2, 2012, 08:34

भारत सरकारने पाकिस्तानाला भारतीय व्यापारात गुंतवणूक करण्याची मुभा दिली आहे. भारत-पाकिस्तान या दोन्ही देशांमधील संबंध सुधारावेत आणि पाकिस्तानाकडून भारताला सर्वांत प्रिय राष्ट्र (MFN) दर्जा मिळावा, या दिशेने हे एक महत्त्वाचं पाऊल मानलं जात आहे.

गुंतवणुकीत महाराष्ट्राची पिछेहाट...

Last Updated: Wednesday, May 23, 2012, 13:55

एका बाजूला राज्याची आर्थिक स्थिती ढासळत असताना दुसरीकडं परदेशी गुंतवणूकदारांनीही राज्याकडे पाठ फिरवण्यास सुरूवात केलीय. फोक्सवॅगननं राज्यातली दोन हजार कोटींची गुंतवणूक काढून घेण्याचा निर्णय घेतलाय.

यासिन भटकळची मुंबईत लाखोंची गुंतवणूक

Last Updated: Thursday, May 10, 2012, 12:16

मुंबई बॉम्बस्फोटांतला मुख्य आरोपी असलेल्या यासीन भटकळची मुंबईत गुंतवणूक असल्याचं उघ़ड झालं आहे. दहशतवादी यासीन भटकळची मुंबईत गुंतवणूक असल्याचे समोर आले आहे.

बजेट गुंतवणूकदारांच्या फायद्याचं

Last Updated: Friday, March 16, 2012, 15:17

यावेळच्या अर्थसंकल्पामध्ये गुंतवणूक वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न केले असल्याचं दिसून आलं आहे. त्यासाठी आयकरामध्ये सवलतही देण्यात आली आहे. अशा प्रकारच्या सवलती गुंतवणूकदारांसाठी फायद्याच्या आहेत आणि आकर्षकही आहेत.

नववर्षाची भेट, शेअर मार्केटमध्ये विदेशींची उडी थेट!

Last Updated: Monday, January 2, 2012, 16:08

भारतीय शेअर बाजारात आता विदेशीं नागरिकांना आता थेट उडी मारता येणरा आहे. थेट व्यक्तिगत परदेशी गुंतवणुकीस सरकारने मंजुरी दिली असून रविवारी रात्री अर्थ मंत्रालयाने या संदर्भातील अधिसूचना जारी केली आहे.

FDIमुळे बाजार उठणार का?

Last Updated: Thursday, December 1, 2011, 17:00

मॉल्स, सुपरमार्केट्समुळे यापूर्वीच स्थानिक व्यापारांच्या उद्योगांवर परिणाम झाला आहे. पण, ते सर्वसामान्य लोकांना मोठ्या प्रमाणावर जाणवलं नाही. पण, यापुढच्या काळात खूप मोठी समस्या निर्माण हऊ शकते. सरकार काही मुद्द्यांचं विश्लेषण करत नाहीये. त्यांचा विचार करायलाच हवा.

वॉलमार्ट येणार आपल्या दारी

Last Updated: Thursday, November 24, 2011, 17:15

सरकारने मल्टी ब्रँड रिटेल क्षेत्रात ५१ टक्के थेट परदेशी गुंतवणुकीला परवानगी दिली आहे. देशातील रिटेल उद्योग आता परदेशी सुपरमार्केटना गुंतवणुकसाठी खुलं करण्यात आल्याचं केंद्रीय मंत्र्यांनी पत्रकारांना सांगितलं.