Last Updated: Saturday, March 17, 2012, 15:45
www.24taas.com, नवी दिल्ली रेल्वे अर्थसंकल्पातल्या भाडेवाढीवरुन तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी दिनेश त्रिवेदींवर चांगल्याच संतापलेल्या आहेत. आता त्रिवेदींना हटवून त्यांच्या जागेवर मुकुल रॉय हे नवे रेल्वे मंत्री असतील असं बॅनर्जी यांनी सांगितलं आहे.
त्रिवेदी हे आमचे रेल्वेमंत्री नाहीत. त्रिवेदींबाबत सरकारने काय तो निर्णय घ्यावा असं सांगत पुढचे रेल्वे मंत्री मुकुल रॉय असतील असंही ममता बॅनर्जी यांनी सांगितलं. दरम्यान ममता बॅनर्जी यांनी राजीनाम्याची लेखी मागणी केली तरच राजीनामा देणार अशी भूमिका दिनेश त्रिवेदी यांनी घेतल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. ममता बॅनर्जी यांचे जवळचे मानले जाणारे कल्याण बॅनर्जी यांनी आज त्रिवेदींना फोन करुन राजीनामा देण्याची सूचना केली.
मात्र कल्याण बॅनर्जी यांच्या फोनवरुन राजीनामा देणार नाही तर ममता बॅनर्जी यांनी लेखी स्वरुपात राजीनाम्याची मागणी केली तरच राजीनामा देऊ अशी भूमिका त्रिवेदी यांनी घेतली आहे.
First Published: Saturday, March 17, 2012, 15:45