जोगींचा भाजपावर हल्लाबोल - Marathi News 24taas.com

जोगींचा भाजपावर हल्लाबोल


झी २४ वेब टीम, नवी दिल्ली
 
छत्तीसगढमधील २०,००० मुलींना गेल्या आठ वर्षात देहव्यापारासाठी दिल्ली, मुंबई, बंगलोर आणि चेन्नईत विकण्यात आल्याचा सनसनाटी दावा काँग्रेसचे नेते अजीत जोगी यांनी केला. दलाल देहव्यापारासाठी मोठ्या प्रमाणावर छत्तीसगढच्या मुलींची बाहेरील राज्यात नेऊन विक्री करतात यासाठी त्यांनी भारतीय जनता पक्षावर हल्ला चढवला. भाजपाचे सरकार या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष्य करत असल्याचा आरोप जोगींनी केला.
 
राज्यातील कायदा आणि सूव्यवस्थेची परिस्थिती हे यामागचे प्रमुख कारण असल्याचे जोगी म्हणाले. छत्तीसगढच्या उत्तर भागातील सरगुजा, कोरबा, जशपूर, कोरिया आणि रायगढ जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर मुलींना नोकरीचे आमिष दाखवून परराज्यात नेण्यात येतं आणि त्यानंतर त्यांना वेश्या व्यवसायात ढकलण्यात येते. जशपूरमध्ये १४ मुलींना फसवून परराज्यात नेऊन विकल्या प्रकरणी एका युवकाला अटक करण्यात आली.

First Published: Sunday, November 13, 2011, 14:56


comments powered by Disqus