Last Updated: Monday, November 14, 2011, 09:44
झी २४ तास वेब टीम, कोलकाता पश्चिम बंगालमध्ये ज्ञानेश्वरी एक्सप्रेसमध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी आरोपी असित महातो याला अटक करण्यात आलीय.
पश्चिम मिदनापूर जिल्ह्यातल्या गोर्नेता गावामध्ये महातोला अटक करण्यात आलीय. या बॉम्बस्फोट प्रकरणी अटक करण्यात आलेल्या माओवाद्यांनी दिलेल्या माहितीवरुन ही कारवाई करण्यात आली.
यावेळी करण्यात आलेल्या कारवाई महातोचे दोन सहकारी पळून गेले. महातोला उद्या न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. अन्य १३ प्रकरणांमध्येही आरोपी असलेला महातो पीपल्स कमिटी अगेन्स्ट पोलिस ऍट्रोलिसीटीज या संस्थेचा प्रवक्ताही होता.
First Published: Monday, November 14, 2011, 09:44