सरकारी शाळेतील विद्य़ार्थी नक्षलवादाकडे - रवीशंकर - Marathi News 24taas.com

सरकारी शाळेतील विद्य़ार्थी नक्षलवादाकडे - रवीशंकर

www.24taas.com,  जयपूर
 
 
सरकारला सरकारी शाळा बंद करण्याची गरज आहे. कारण सरकारी शाळांमधून शिक्षण घेणारे विद्य़र्थी हे ननक्षलवाद आणि हिंसेच्या मार्गावर चालत आहेत, असा शोध आर्ट ऑफ लिव्हींगचे प्रणेते श्रीश्री रवीशंकर यांनी लावला आहे.
 
 
रवीशंकर आदर्श शिक्षा समितीच्या एका कार्यक्रमाला संबोधित करीत होते. त्यावेळी  त्यांनी हे वादग्रस्त विधान केले आहे. त्यांचे म्हणणे आहे की, सकरारकडून चालविण्यात आलेल्या शाळा बंद करण्याची गरज निर्माण झाली आहे.  या शाळांमध्ये शिक्षण घेणारी मुले ही नक्षलवाद आणि हिंसाचाराला आर्दश मानत आहेत. हा मार्ग मुले स्वीकारत आहेत. तसे संस्कार सरकारी शाळांमधून होत आहेत. त्यामुळे भविष्यात धोका निर्माण होईल. त्यासाठी अशा शाळा काय कामाच्या, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
 
 
रवीशंकर यांनी आदर्श शिक्षा समितीला आवाहन केले आहे की, नक्षल रभावित भागात शाळा सुरू करा. नक्सल भागात सरकारी शाळा होण्याआधी आदर्श शिक्षा समितीने शाळा सुरू करण्याची गरज आहे. कारण या भागातील मुले चांगले शिक्षण घेऊन संस्कारक्षम होतील. यामुळे नक्सलवाद आणि हिंसाचारापासून ती परावृत्त होतील.

First Published: Wednesday, March 21, 2012, 11:03


comments powered by Disqus