Last Updated: Thursday, March 22, 2012, 13:18
www.24taas.com, नवी दिल्ली रेल्वेची प्रस्तावित भाडेवाढ मागे घेण्यात आली आहे. रेल्वेमंत्री मुकुल रॉय यांनी याबाबत लोकसभेत घोषणा केली. मात्र, एसीची हवा गरम राहणार आहे. तृणमूलच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांच्यापुढे सरकार झुकले असल्याचे स्पष्ट झाले आहे.
जनरल, स्लीपर आणि ३ टायर एसी प्रवासाची भाडेवाढ मागे घेण्यात आलीये. मुंबई उपनगरीय रेल्वे सेवेची भाडेवाढही मागे घेण्यात आली. एसी १ आणि एसी २टायरची भाडेवाढ मात्र कायम ठेवण्यात आली आहे. रेल्वेचं भाडं वाढवलं म्हणून तृणमुल काँग्रेसचे दिनेश त्रिवेदी यांना राजीनामा द्यावा लागला होता. प. बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी रेल्वे भाडेवाढ मागे घेण्याची मागणी केली होती. त्यानुसार रेल्वेमंत्री मुकुल रॉय यांनी प्रस्तावित रेल्वेभाडेवाढ मागे घेत असल्याची घोषणा केली.
First Published: Thursday, March 22, 2012, 13:18