'टीम अण्णांचं वक्तव्यं अपमानास्पद' - Marathi News 24taas.com

'टीम अण्णांचं वक्तव्यं अपमानास्पद'

www.24taas.com, नवी दिल्ली
 
 
टीम अण्णाच्या आक्षेपार्ह वक्तव्यांविरोधात लोकसभेत खासदारांनी आक्रमक होत गोंधळ घातला. जेडीयु नेते यांनी लोकसभेत नोटीस बजावल्यानंतर लोकसभेत या विषयावर सर्व एकत्र आले आहेत. टीम अण्णा सदस्यांची वक्तव्यं अपमानास्पद असल्याचं संसद सदस्यांनी म्हटलं आहे. मांडण्यात आलेल्या ठरावावर आता चर्चा सुरू झाली आहे.
 
 
टीम अण्णाचे सदस्य खासदारांना लुटारू, भ्रष्टाचारी किंवा बलात्कारी म्हणून हिणवत असतील तर ते त्याच खासदारांकडून लोकपाल बिल पास करून घेण्यासाठी प्रयत्न का करतायत, असा सवाल विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांनी केलाय..खासदारांविरोधात अपशब्द वापरून लोकशाहीचा अपमान करणारी टीम अण्णा हुकूमशाही करत असल्याचा आरोपही स्वराज यांनी केला आहे. खासदारांविरोधात अपशब्द वापरले जात असतील तर संसदेचं रक्षण कोण करणार ?असा प्रश्न जेडीयु नेते शरद यादव यांनी उपस्थित केला आहे.
 
 
टीम अण्णाच्या आक्षेपार्ह वक्तव्यांविरोधात लोकसभेत खासदारांनी आक्रमक होत गोंधळ घातल्यानंतर निंदाजनक ठरावावर आता चर्चा करण्यात येणार आहे. तर सर्वच विरोधकांनी आणि सत्ताधारी खासदारांनी टीम अण्णांना संसदेबद्दल काहीही देणं घेणं नाही. त्यांना लोकशाहीचं महत्व वाटत नाही. मात्र, भ्रष्टाचाराप्रती वाटेल ते बोलत आहे. हा संसदेचा आणि खासदारांचा अपमान आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होणे आवश्यक असल्याचे मत आजच्या विरोधानंतर अनेक खासदारांनी व्यक्त केले.

First Published: Tuesday, March 27, 2012, 18:26


comments powered by Disqus