पेट्रोल दरवाढ तूर्त टळली - Marathi News 24taas.com

पेट्रोल दरवाढ तूर्त टळली

www.24taas.com, मुंबई
 
पेट्रोलची शनिवारी होणारी दरवाढ टळल्यामुळे ग्राहकांना तूर्तास तरी दिलासा मिळाला आहे. सरकारी मालकीच्या पेट्रोल कंपन्यांनी सध्या प्रती लिटरमागे ७.६५ रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. त्यामुळेच पेट्रोलच्या किरकोळ विक्रीदरात वाढ करण्याशिवाय पर्याय उरला नव्हता.
 
पेट्रोलवर आकारला जाणारा प्रती लिटर १४.३५ अबकारी कमी करण्याची मागणीही सरकारी पेट्रोल कंपन्यांनी केली आहे. पण अद्याप तरी सरकारकडून यासंदर्भात कंपन्यांना कोणतेही स्पष्टीकरण प्राप्त झालेलं नाही. सरकारच्या उत्तराची प्रतिक्षा आणखी एक दिवस करण्याचं कंपन्यायंनी ठरवलं असल्याने दरवाढ तात्पुरती तरी टळली आहे.

First Published: Sunday, April 1, 2012, 14:14


comments powered by Disqus