Last Updated: Thursday, April 5, 2012, 11:52
www.24taas.com, नवी दिल्ली 
शरद पवारांविषयी आपल्या मनात कोणताही राग नाही. यशवंतराव चव्हाणांचं अनुकरण पवारांनी केलं असतं तर कदाचित तेही पंतप्रधान झाले असते. अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिली आहे. पवारांनी नको त्या लोकांची संगत केली, त्यामुळेच त्यांचं राजकीय नुकसान झालं आहे, असं सांगायलाही अण्णा विसरले नाहीत.
या आधीही अण्णांनी अनेक वेळा शरद पवारांवर शरसंधान साधलं आहे. त्यामुळे आता अण्णांचा या वक्तव्याचा शरद पवार कसा समाचार घेतात. हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्याच सोबत अण्णांनी काँग्रेसचे युवराज राहुल गांधी यांना देखील सुनावले आहे.
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राहुल गांधींवर पुन्हा एकदा शरसंधान साधलं आहे.. राहुल गांधींमध्ये पंतप्रधान पदासाठी आवश्यक गुण नाहीत. त्यांच्याकडे अपमान पचवण्याची शक्ती नाही अशा शब्दात अण्णांनी राहुल यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. सुशासन निर्माण करण्यासाठी तरूणांनी राजकारणात येण्याचं आवाहन केलं आहे.
First Published: Thursday, April 5, 2012, 11:52