आफरीनची मृत्‍यूपुढे शरणागती - Marathi News 24taas.com

आफरीनची मृत्‍यूपुढे शरणागती

www.24taas.com,बंगळुरु
 
तिची एकच चूक. मुलीचा जन्म घेतल्याची. आपल्या पोटी मुलगी जन्मला आल्याने राक्षसी बाप जागा झाला. या बापाने मानवतेचा जराही विचार न करता तीन महिन्याच्या आफरीनचा छळ करून तिचे भिंतीवर डोके आपटले आणि तेथून तिच्या जगण्याची आशा मावळली. तीन दिवस रूग्णालयात जगण्याचा संघर्ष करणाऱ्या आफरीनने आज बुधवारी चौथ्या दिवशी जगाचा  निरोप घेतला.
 
 
वडिलांच्या छळाला सामोरं जायला लागलेल्या  आफरीनचा वणी विलास रूग्णालयात मृत्यू झाला. गेल्या तीन दिवसांपासून आफरीन मृत्यूशी झुंज देत होती. मुलाच्या हव्यासापोटी वडिल उमर फारुखने पोटच्या तीन महिन्‍याच्या मुलीचं डोकं भिंतीवर आपटलं होतं. रविवारी तिला वणी विलास रुग्‍णालयात दाखल करण्‍यात आले होते. तिच्‍या मेंदुला गंभीर मार लागला होता. आज सकाळी  तिच्या शरीरास झटके बसत होते. तिला कृत्रिम श्‍वासोच्‍छवासावर ठेवण्‍यात आले होते. मात्र, त्याचा उपयोग झाला नाही.  तिला ह्रदयविकाराचा झटका आल्याने तीन आयुष्याचा दम तोडला.
 
 
फारुखने रागाच्या भरात तिच्या कपाळावर आणि मानेवर दिलेले सिगरेटचे चटके दिले होते, ही बाब तिला रूग्णालयात दाखल केल्यानंतर स्पष्ट झाली.  ८ एप्रिलला उमर फारुखच्या विरूध्द आफरीच्या आईने पोलिसात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी त्याला २१ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. स्वत:च्या पोटच्या मुलीचा छळ करणा-या बापाला कडक शिक्षा व्हावी अशी आफरीनच्या आईची इच्छा आहे. 

First Published: Wednesday, April 11, 2012, 13:54


comments powered by Disqus