आफरीनची मृत्‍यूपुढे शरणागती

Last Updated: Wednesday, April 11, 2012, 13:54

तिची एकच चूक. मुलीचा जन्म घेतल्याची. आपल्या पोटी मुलगी जन्मला आल्याने राक्षसी बाप जागा झाला. या बापाने मानवतेचा जराही विचार न करता तीन महिन्याच्या आफरीनचा छळ करून तिचे भिंतीवर डोके आपटले आणि तेथून तिच्या जगण्याची आशा मावळली. तीन दिवस रूग्णालयात जगण्याचा संघर्ष करणाऱ्या आफरीनने जगाचा आज बुधवारी निरोप घेतला.