Last Updated: Friday, April 13, 2012, 14:29
नवी दिल्ली/पाटणा बिहारचे मुख्यमंत्री नीतिश कुमार यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना प्रतिउत्तर देताना बिहार दिनाचे मला निमंत्रण दिले गेले आहे. त्यामुळे मी उत्तर प्रदेशचा मुख्यमंत्री या नात्याने मुंबईत जाणार आहे, असे जाहीर केले आहे. त्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे हा वाद नीतिश कुमार यांनीच निर्माण केला आहे.
१५ एप्रिलला कोणताही राजकीय कार्यक्रम नाही. बिहार दिनाचा सांस्क़तिक कार्यक्रम आहे. त्यामुळे आपण मुंबईत जाणार आहे. या कार्यक्रमाचा कोणाला त्रास होण्याचा प्रश्नच नाही. महाराष्ट्रात महान व्यक्तींचा जन्म झाला आहे. त्यांनी देशाला दिशा दिली आहे. मी महाराष्ट्राच्या भूमीचा आदर करतो. मी मुंबईत जाऊन महाराष्ट्राच्या भूमीला साष्टांग घालीन. मुंबईत जो कार्यक्रम आयोजित केला आहे, ते बिहारी लोक गरीब आहेत. त्यांचा महाराष्ट्रातील लोकांना त्रास होईल, असे मला वाटत नाही, असे नीतिश कुमार म्हणाले.
महाराष्ट्रातील आणि बिहारमधील लोक एकमेकांना मदत करीत आले आहेत. बिहारी लोक महाराष्ट्रातील लोकांचा आदर करतात. बिहारमधील समस्येमुळे येथील लोक मुंबईत गेले आहेत. आता बिहारमध्ये चांगले वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे त्यांनी बिहार दिनाचे आयोजन केले असल्याचे नीतिश म्हणाले.
First Published: Friday, April 13, 2012, 14:29