पंतप्रधानांचं अण्णांना लोकपाल लेटर - Marathi News 24taas.com

पंतप्रधानांचं अण्णांना लोकपाल लेटर

झी २४ तास वेब टीम,राळेगणसिद्धी
 
संसदेच्या हिवाळी अधिवेशनात लोकपाल बिल मंजूर होईल, असं पत्र पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंना पाठवलय.
 
अण्णा हजारेंनी याबाबत राळेगणसिद्धीत माहिती दिली. यामुळं विधानसभा निवडणूक होणा-या पाच राज्यांचा दौरा पुढे ढकलल्याचंही अण्णांनी सांगितलय. तसच या अधिवेशनात बिल मंजूर झालं नाही तर पुन्हा रामलीला मैदानावर उपोषणाला बसण्याचा इशाराही अण्णांनी दिलाय.
 
अण्णा हजारेंनी  जनलोकपाल बिलाबाबत दिल्लीत रामलिला मैदानावर उपोषण केलं होतं.   अण्णांच्या आंदोलनाला संपूर्ण देशातून पाठिंबा मिळाला. त्यामुळं केंद्र सरकारला नमते घ्यावे लागले होते. मात्र, केंद्र सरकारने जनलोकपाल बिलाबाबत दिशाभूल केल्याने अण्णा हजारेंच्या सहकाऱयांनी हिसार निवडणुकीत कॉंग्रेसविरोधात प्रचार केला. तसेत अण्णा हजारेंनी  पुन्हा आंदोलनाचा ईशारा दिला होता.

First Published: Wednesday, November 23, 2011, 07:29


comments powered by Disqus