"नीतीश मनसेपुढे का झुकले?"- लालू - Marathi News 24taas.com

"नीतीश मनसेपुढे का झुकले?"- लालू

www.24taas.com, पाटणा
 
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अटींपुढे नितीशकुमारांनी झुकून मुंबईमध्ये बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी बिहारी अस्मितेला कलंक लावला असल्याचा आरोप राजदचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी केला आहे.
 
“मुंबईत आयोजित केलेल्या बिहार दिवस कार्यक्रमात नीतीश यांनी मनसेच्या सर्व अटी मान्य करून त्यांच्यापुढे गुडघे टेकायचं काम केलं. बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी मुंबईत बिहारी अस्मितेवर हातोडा मारायचं काम केलंय. बिहारची भूमी ही सामान्य जमीन नाही. बिहार ही सूफी संतांची भूमी आहे त्यामुळे बिहारींनी कुणापुढे झुकू नये.” असं लालू प्रसाद यांनी १० सुर्कलर येथील माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांच्या निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हटले.
 
लालू यांनी देवेश ठाकूर यांचाही चांगलाच समाचार घेतला. या सगळ्या तडजोडीला देवेश ठाकूरच जबाबदार आहेत, असं लालू म्हणाले. बिहारमधील गरीबी, कायदा, शिक्षण या समस्यांवर विचार करण्याऐवजी नीतीशकुमार मुंबईला जाऊन बिहार दिवस साजरा करत बसले, असंही लालू प्रसाद म्हणाले.
 

First Published: Monday, April 16, 2012, 22:17


comments powered by Disqus