Last Updated: Friday, April 13, 2012, 16:24
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची बिहार दिनाचे आयोजक देवेश ठाकूर यांनी भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर बिहाराचे मुख्यमंत्री नीतिश कुमार यांच्याशी फोनवरून बोलणे झाल्यानंतर राज यांनी बिहार दिनाला हिरवा कंदील दाखवला. बिहार दिन हा राजकीय कार्यक्रम नसल्याने तो सांस्कृतिक आहे. त्यामुळे आपली काही हरकत नाही, अशी भूमिका राज ठाकरे यांनी घेतली.