ओडिशातील अपहृत आमदाराची सुटका? - Marathi News 24taas.com

ओडिशातील अपहृत आमदाराची सुटका?

www.24taas.com, भुवनेश्वर
 
बिजू जनता दलाचे आमदार जिन्हा हिकाका यांची गुरूवारी सुटका करण्याचा निर्णय माओवाद्यांनी घेतला आहे. हिकाका यांना  उद्या सकाळी दहा वाजता कोरपूट जिल्ह्यातील बलीपेटा गावात सोडण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
 
 
हिकाका यांना सुटकेनंतर लगेचच आमदार पदाचा राजीनामा देण्यास सांगण्यात आले आहे. माओवाद्यांचे न्यायालय कोठे भरले होते, याबाबत माहिती मिळू शकली नाही. दरम्यान, माओवाद्यांच्या न्यायालयात हिकाका यांना सोडण्याचा निर्णय़ आज घेण्यात आल्याचे हिकाका यांचे वकील निहार पटनाईक यांनी स्पष्ट केले.
 
हिकाका यांचे महिन्यापूर्वी कोरपूट जिल्ह्यातून अपहरण करण्यात आले होते. हिकाका यांना सोडण्यासाठी माओवाद्यांनी सरकारकडे केलेली मागणी सरकारने पू्र्ण केली आहे. त्यानुसार २५ माओवाद्यांना कारागृहातून सोडण्यात येणार आहे. यातील १३ जणांविरुद्ध दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात आले आहेत

First Published: Wednesday, April 25, 2012, 12:41


comments powered by Disqus