बिहारमध्ये रेल्वेवर नक्षली हल्ला, तीन जवान शहीद

Last Updated: Saturday, November 30, 2013, 22:03

बिहारमध्ये नक्षलींनी केलेल्या हल्ल्यात जीआरपीचे तीन जवान शहीद झालेत. जमालपूरमध्ये दानापूर-साहेबगंज इंटरसिटी एक्स्प्रेसवर नक्षलींनी हल्ला केला. बिहारच्या मुंगेर जिल्ह्यात आज संध्याकाळी ही घटना घडली. या हल्ल्यात दोन जवान जखमीही झाले आहेत.

गडचिरोलीत नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात तीन जवान शहीद

Last Updated: Thursday, October 17, 2013, 09:45

ग़चिरोलीमध्ये नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात तीन जवान शहीद झाले आहेत. कुरखेडा तालुक्यातल्या झरी गावातल्या जंगलात ही घटना घडलीय. काल रात्री नक्षलविरोधी अभियानादरम्यान नक्षलवाद्यांनी भूसुरूंगाचा स्फोट घडवून आणला.

नक्षलवादी हल्ल्यात सहा पोलीस शहीद

Last Updated: Tuesday, July 2, 2013, 19:51

झारखंडमध्ये काठीकुंड परिसरात नक्षलवाद्यांनी पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला चढवलाय. या हल्ल्यात पाकूरचे एसपी अमरजीत बलिहार यांच्यासह पाच पोलीस जवान शहीद झाले आहेत.

सुकुमाचे जिल्हाधिकारी मेनन यांची सुटका

Last Updated: Thursday, May 3, 2012, 16:13

गेल्या १३ दिवसांपासून माओवाद्यांच्या ताब्यात असले छत्तीसगडमधल्या सुकुमाचे जिल्हाधिकारी अॅलेक्स पॉल मेनन यांची अखेर नक्षल्यांनी आज सुटका केली आहे.

माओवाद्यांनी केली अपहृत आमदाराची सुटका

Last Updated: Thursday, April 26, 2012, 09:26

बिजू जनता दलाचे आमदार जिन्हा हिकाका यांची आज गुरूवारी सुटका माओवाद्यांनी केली आहे. हिकाका यांची सुटका होण्यासाठी ओडिशा सरकारला मोठी किंमत मोजावी लागली आहे. हिकाका यांनी पटणामधील नारायण जंगलात सोडण्यात आले आहे. मात्र, अधिकाऱ्यांनी याबाबत अधिकृत माहिती दिलेली नाही.

ओडिशातील अपहृत आमदाराची सुटका?

Last Updated: Wednesday, April 25, 2012, 12:41

बिजू जनता दलाचे आमदार जिन्हा हिकाका यांची गुरूवारी सुटका करण्याचा निर्णय माओवाद्यांनी घेतला आहे. हिकाका यांना उद्या सकाळी दहा वाजता कोरपूट जिल्ह्यातील बलीपेटा गावात सोडण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.