Last Updated: Wednesday, May 2, 2012, 14:57
www.24taas.com, शिर्डी 
भारताच्या संसदेत खुनी मंत्री बसले आहेत असं वादग्रस्त वक्तव्य बाबा रामदेवांनी केल्यानंतर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनीही त्यांच्या या वक्तव्याचं समर्थन केलं आहे.
गेल्या काही दिवसांच्या उदाहरणावरून हे सिद्ध झाल्याचंही अण्णांचं म्हणणं आहे. अनेक गंभीर आरोप असलेल्या व्यक्तींना राजकीय पक्ष तिकिटं देतात म्हणूनच ते निव़डून संसदेत जातात असंही अण्णांनी नमूद केलं आहे.
त्यामुळे भष्ट्राचाराच्या लढाईसाठी अण्णा हजारे आणि बाबा रामदेव हे पुन्हा एकदा पुढे सरसावले आहेत. बाबा रामदेव यांनी संसदेत असणाऱ्या मंत्र्यांना टार्गेट करत खुनी म्हटलं होतं, तर त्याचच समर्थन अण्णा हजारे यांनी केलं होतं.
First Published: Wednesday, May 2, 2012, 14:57