सुकुमाचे जिल्हाधिकारी मेनन यांची सुटका - Marathi News 24taas.com

सुकुमाचे जिल्हाधिकारी मेनन यांची सुटका

www.24taas.com,रायपूर
 
गेल्या १३ दिवसांपासून माओवाद्यांच्या ताब्यात असले छत्तीसगडमधल्या सुकुमाचे जिल्हाधिकारी अॅलेक्स पॉल मेनन यांची अखेर नक्षल्यांनी आज सुटका केली आहे.
 
 
मेनन पॉल यांच्या सुटकेसाठी सरकारी पातळीवरून जोरदार प्रयत्न सुरु होते. आजही सरकारकडून वाटाघाटीसाठी मध्यस्थांना पाठवण्यात आलं होतं. यामध्ये ते यशस्वी झालेत. माओवाद्यांचे प्रतिनिधी बी. डी. शर्मा आणि प्राध्यापक हरगोपाल तडमेटला येथे जाण्यासाठी निघाले आहेत. त्यांना माओवाद्यांकडून ऍलेक्‍स मेनन यांचा ताबा देण्यात येणार आहे. अस्थमाचे रुग्ण असल्याने मेनन यांना जंगलातून सुरक्षितपणे परत अणण्यासाठी राज्य सरकारने सर्व उपयोजना केल्या आहेत.
 
 
मेनन यांची आजच सुटका होईल असा विश्वास मध्यस्थांना होता. त्यासाठी सरकार आणि नक्षलींमधला दुवा असणारे दोन मध्यस्थ आज हेलिकॉप्टरने नक्षलींच्या गोटाकडे रवाना झाले होते. १३ दिवसांपूर्वी मेनन यांचं अपहरण करण्यात आले होते.मेनन यांची आरोग्य तपासणी करण्यासाठी सुकमा, दंतेवाडा आणि जगदलपूर येथील आरोग्य अधिकाऱ्यांना सज्ज राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
 
 

First Published: Thursday, May 3, 2012, 16:13


comments powered by Disqus