घरीच बसा, १० पायलटांवर कारवाई - Marathi News 24taas.com

घरीच बसा, १० पायलटांवर कारवाई

www.24taas.com, मुंबई
 
एअर इंडियाच्या पायलट्सचा संप चिघळला आहे. संपकरी पायलट्सपैकी दहा पायलट्सवर बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे. हा संप बेकायदेशीर असल्याचं नागरी उड्डयणमंत्री अजित सिंह यांनी म्हटलं आहे. संपावर गेलेल्या पायलट्सना संध्याकाळी ६ पर्यंत कामावर हजर राहण्याचं अल्टिमेटम देण्यात आलं होतं.
 
संपाबाबत कुठलीही माहिती न देता तब्येतीचं कारण पुढे करत १०० पेक्षा जास्त पायलट्सनी सुट्टी टाकली आहे. त्यामुळं आंतरराष्ट्रीय वाहतूकीवर त्याचा परिणाम झाला आहे. दिल्ली- टोरांटो, मुंबई-शिकागो, मुंबई-न्यूयार्क, मुंबई-दिल्ली-हाँगकाँग या चार फ्लाईट्स रद्द करण्यात आल्या आहेत. मात्र कुठल्याही प्रकारचा अघोषित संप न करता व्यवस्थापनाबरोबर चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न करण्याचं आवाहन अजित सिंग यांनी पायलट्सना केल ं आहे.
 
दोन दिवसांपासून मागण्यांबाबत पायलटांचे व्यवस्थापनाशी  बोलणे सुरू होते. मात्र, तोडगा न निघाल्याने पायलटांना कामबंद आंदोलन सुरू केले. केवळ देशांतर्गंत उड्डाण करणाऱ्या वैमानिकांनाच नव्याने दाखल झालेल्या बोइंग ७८७चे प्रशिक्षण देण्याच्या एअर इंडियाच्या व्यवस्थापनाच्या निर्णयाविरोधात या पायलटनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. अन्य पायलटही यामध्ये सहभागी होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
 
 
 

First Published: Tuesday, May 8, 2012, 15:22


comments powered by Disqus