Last Updated: Thursday, June 12, 2014, 10:46
www.24taas.com, वृत्तसंस्था, लखनऊउत्तर प्रदेशात महिला असुरक्षित असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे. महिलांवर दिवसागणिक बलात्कार वाढत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. कायद्याचे रक्षकच भक्षक झाल्याचे दिसत आहे. हमीरपूर जिल्ह्यातील समशेरपूर पोलीस ठाण्यातील चार पोलीस कर्मचाऱ्यांनीच एका महिलेवर बलात्कार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.
उत्तर प्रदेशात सतत बलात्कार आणि खूनाच्या घटना उघडकीस आल्या आहेत. यामध्ये आणखी एका घटनेची वाढ झाली आहे. चक्क पोलिसांनीच बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. पोलीस ठाण्यात एका गुन्ह्यात कैद असलेल्या पतीला भेटण्यासाठी गेलेल्या महिला ठाण्यात बांधून तिच्यावर काही पोलिसांनी बलात्कार केला.
पिडीत महिलेच्या पतीला पोलिसांनी सोडून दिले होते. त्यावेळी तो घरी जात होता. मात्र, पुन्हा चौकशीच्या नावाखाली पोलिसांनी त्याला अटक केली. आपल्या पतीला भेटायला गेलेल्या 25 वर्षीय महिलेवर पोलिसांनी धाक दाखवून सामूहिक बलात्कार केला.
या घटनेनंतर या महिलेने हमीरपूरचे पोलीस अधिक्षक वीरेंद्र शेखर यांच्याकडे जाऊन तक्रार दाखल केली. महिलेच्या तक्रारीवरून पोलीस ठाण्याच्या प्रमुखाला अटक करण्यात आली आहे. तर, अन्य तीन कर्मचाऱ्यांचा शोध घेण्यात येत आहे.
उत्तर प्रदेशातील बदायूँ जिल्ह्यात नुकतेच दोन मुलींवर बलात्कार करून खून केल्याची घटना घडली होती. त्यानंतरही काही बलात्काराच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे उत्तर प्रदेश कायदा आणि सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजल्याचे पाहायला मिळत आहेत.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Thursday, June 12, 2014, 10:46