Last Updated: Tuesday, February 5, 2013, 17:40
www.24taas.com, हैदराबादविश्व हिंदू परिषदेचे नेते प्रवीण तोगडिया यांनी मजलिस-ए-एत्तेहादूलचे आमदार अकबरुद्दीन ओवैसी यांचा उल्लेख ‘कुत्ता’ असा केला आहे. युट्युबवरील भाषणात ही ओवैसीचं नाव न घेता प्रवीण तोगडीयांनी त्यांना कुत्ता म्हटलं आहे.
ओवैसीनी हैदराबादजवळ निर्मळ येथे प्रक्षोभक भाषण केलं होतं. त्याबद्दल ओवैसीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच भाषणाला प्रत्युत्तर देताना तोगडिया यांनी आपल्य़ा भाषणात ओवैसींचं नाव न घेता त्यांचा उल्लेख ‘हैदराबादचा कुत्ता’ असा केला. आपल्या भाषणात तोगडिया म्हणाले, कती हैदराबादचा एक कुत्रा स्वतःला वाघ समजू लागला आहे. मुस्लिम व्होट बँकेला हाताशी धरून देशात लूट चालवली आहे, असंही तोगडिया म्हणाले.
गेल्या २०-२५ वर्षांतील दंगलींचा हवाला देत तोगडिया म्हणाले, की पोलीस हटवण्याची भाषा करणाऱ्यांनी पोलीस हटवल्यानंतरचा इतिहास तपासून पाहावा. त्यानंतर आम्हाला आव्हान देण्याची चूक करू नका.
First Published: Tuesday, February 5, 2013, 17:40