Last Updated: Tuesday, April 29, 2014, 19:18
www.24taas.com, झी मीडिया, राजस्थान रेल्वेत आग लागल्यास, ती विझवण्यासाठी एक नविन उपकरण राजस्थानच्या कोटा येथील इंजिनिअर्सनी शोधून काढलं आहे. रेल्वेच्या डब्यातील कोचखाली हे उपकरण बसवून हवेच्या दबावामुळे गाडीला लागलेली आग विझवता येणार आहे.
अनेक वेळेला रेल्वेला लागलेली आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्यांसाठी थांबून राहावे लागते. या गोष्टीने होणाऱ्या विलंबामुळे अनेक वेळेस मोठ्या अपघातांना समोर जावं लागतं. या कारणासाठीच कॅरीज वॅगनचे वरिष्ठ अभियंता मुकेशकुमार जैन यांनी रेल्वेच्या स्क्रॅप एअर टँकपासून अग्निशमन उपकरण तयार केले आहे.
या टँकमध्ये एक हजार लिटर पाणी असणार आहे. ही टँक कोचच्या आतून खालच्या भागात बसवले जातील. गाडीला आग लागल्यास पाच ते दहा मिनिटांत बचावकार्य सुरू होईल. तसेच हे टँक गाडीतच असल्या कारणाने, टँकची सुविधा २४ तास उपलब्ध असणार आहे. रेल्वेतील दोन कर्मचारी देखील हे उपकरण वापरू शकणार आहेत. याच कारणाने रेल्वेतील आगीचे अपघात आता कमी होण्यास पूर्ण सहाय्य मिळणार आहे.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Tuesday, April 29, 2014, 19:18