Last Updated: Tuesday, April 10, 2012, 11:30
देशभरात २०१३-१४ पासून अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी सामायिक परीक्षा (आयसीट) महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना मराठीतून देता यावी, अशी परवानगी मागण्याचा प्रस्ताव केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाला पाठविण्यात येईल, असे आश्वासन उच्च व तंत्र शिक्षणमंत्री राजेश टोपे यांनी सोमवारी विधान परिषदेत दिले.