Last Updated: Tuesday, June 10, 2014, 22:55
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्लीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांना त्यांच्या संपत्तीची माहिती, 15 दिवसांच्या आत सादर करावी लागणार आहे.
तसेच लिखित स्वरूपात घोषणाही करावी लागणार आहे की, त्यांचा दुसरा कोणताही व्यवसाय नाही.
गृहमंत्रालयाने याबाबतीत सर्व मंत्र्यांना मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत.
यूपीए सरकार असतांना अशा प्रकारच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र शेवटपर्यंत 11 ते 12 मंत्र्यांनी आपल्या संपत्तीची माहिती सार्वजनिक केली नव्हती.
कोणत्याही व्यावसायिक गोष्टींपासून दूर रहा, जर आपण यापूर्वी कोणत्याही व्यवसायाशी संबंधित असाल, तर आपण तो सोडावा असंही सूचित करण्यात आलं आहे.
गृह मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार मंत्र्यांसाठी बनवण्यात आलेल्या कोड अॅण्ड कंटक्टची माहिती त्यांना देण्यात आलेली आहे. प्रत्यक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या प्रक्रियेचा आढावा घेणार आहेत.
कोड आणि कंडक्टनुसार कोणत्याही मंत्र्याच्या पती अथवा पत्नीला किंवा त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या व्यक्तीला दुसऱ्या देशाच्या मिशनवर नोकरी करता येणार नाही.
आपल्या नावावर तसेच सदस्यांच्या नावावरील या संपत्तीचा लेखाजोखा पब्लिक डोमेनवर सार्वजनिक केला जाणार आहे.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Tuesday, June 10, 2014, 22:55