१ हजार टन सोनं शोधायला बाबा शोभन सरकारच मैदानातUnnao gold Hunt: Baba Shobhan Sarkar tell his devotee

१ हजार टन सोनं शोधायला बाबा शोभन सरकारच मैदानात

१ हजार टन सोनं शोधायला बाबा शोभन सरकारच मैदानात
www.24taas.com, झी मीडिया, उन्नाव, उत्तर प्रदेश

आपल्या सोन्याच्या स्वप्नानं संपूर्ण देशाला हादरवून सोडणारे बाबा शोभन सरकार आता स्वत:च सोन्याचा शोध घेण्यासाठी मैदानात उतरले आहेत. `चमत्कार होणारच, सोनं मिळणारच` असा ठाम दावा करत सरकारांनी आपल्या भक्तांना खोदकामाचे आदेश दिले आहेत.

उत्तर प्रदेशातल्या डौडियाखेडा इथं राजा राव रामबक्शसिंह यांच्या किल्ल्याखाली एक हजार टन सोनं असल्याचं स्वप्न इथले बाबा शोभन सरकार यांना पडलं होतं. त्यांचं हे स्वप्न संपूर्ण गावासह उत्तर प्रदेश सरकारनं गंभीरपणे घेतलं होतं... त्यानंतर सुरू झाला होता स्वप्नातल्या सोन्याचा शोध. तब्बल महिनाभर पुरातत्व विभागानं परिसरात खोदकाम केलं. पण त्यांना सोन्याची एक मुद्राही सापडली नाही तर खजाना तर दूरच राहिला.

सरकारच्या या उपक्रमावर विविध पक्ष आणि संघननांकडून प्रचंड टीका झाली. या विरोधात कोर्टात याचिकाही दाखल करण्यात आली. महिनाभर खोदून काही मिळालं नसल्यानं पुरातत्व विभागानं हे मिशन अर्धवट सोडून दिलं. मात्र बाबा शोभन सरकार अजूनही आपल्या स्वप्नावर ठाम आहेत. त्यांनी गुरुवारी बक्सर इथं होम-हवन केलं आणि आपल्या शिष्यांना नव्यानं खोदकाम सुरू करण्याची आज्ञा दिली. मग सगळे बाबांचे चेले मीडियासमोर बाबांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या ओमबाबांसोबत दोन जेसीबी मशीन घेऊन किल्ल्याकडे वळल्या.

दरम्यान, जिल्हा प्रशासनाला याबाबत माहिती मिळताच पोलिसांच्या मदतीनं त्यांनी खोदकाम करण्यासाठी आलेल्या बाबा शोभन सरकारच्या भक्तांना अडवलं. त्यांच्याकडून जेसीबी मशीन ताब्यात घेण्यात आली असून खोदकामासाठी कोणालाही परवानगी देण्यात आली नसल्याचं जिल्हाधिकारी व्ही. के. आनंद यांनी स्पष्ट केलंय.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, November 23, 2013, 12:53


comments powered by Disqus