Last Updated: Wednesday, March 5, 2014, 18:21
www.24taas.com, झी मीडिया, मेरठ मेरठमध्ये कश्मीरी विद्यार्थ्यांनी पाकिस्तान क्रिकेट टीमचं समर्थन केल्यामुळे इथं तणावाच वातावरण निर्माण झालं होतं.
रविवारी युनिव्हर्सिटीचे विद्यार्थी कम्युनिटी हॉलमध्ये टेलिव्हिजनवर भारत-पाकिस्तान दरम्यान झालेली मॅच पाहत होते. टीम इंडिया मॅच हरल्यानंतर अचानक इथलं वातावरण बिघडलं. काही विद्यार्थी गटागटानं एकमेकांना भिडले. विद्यार्थ्यांमध्ये दगडफेकही झाली. यामुळे, युनिव्हर्सिटीनं ६७ काश्मीरी विद्यार्थ्यांना पाकिस्तान क्रिकेट टीमचं समर्थन करण्याचा आरोप करत निलंबित केलंय.
पाक टीमचं समर्थन केल्यामुळे या विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली, असं सांगत भारतीय जनता युवा मोर्चा याविरोधात आंदोलन करत आहे. युनिव्हर्सिटी प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, जेव्हा हा तणाव दुसऱ्या दिवशीही कायम राहिला तेव्हा काश्मीरी विद्यार्थ्यांना निलंबित करण्यात आलं. त्यांना काही दिवसांसाठी हॉस्टेलमधून बाहेर काढण्यात आलंय. युनिव्हर्सिटी प्रशासनानं विद्यार्थ्यांच्या दुसऱ्या गटाविरुद्ध कोणतीही कारवाई केलेली नाही.
विद्यार्थ्यांना पूर्ण सुरक्षेत मेरठच्या बाहेर गाझियाबाद पाठवण्यात आलंय काही विद्यार्थी काश्मीरला परतलेत, असा लांकी युनिव्हर्सिटीनं दावा केलाय.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, March 5, 2014, 15:34