Last Updated: Monday, January 27, 2014, 14:39
www.24taas.com झी मीडिया , नवी दिल्ली आम आदमी पक्षाचे बंडखोर आमदार विनोद कुमार बिन्नी यांना पक्षानं निंलबित केलंय. मात्र या निलंबनानंतर विनोद कुमार बिन्नी यांनी नवा दावा केलाय. पक्षातील तीन-चार आमदारांचं आपल्याला समर्थन असल्याचं बिन्नी म्हणाले. मात्र त्या आमदारांची नावं विनोद कुमार बिन्नी यांनी उघड केली नाहीत.
जनतेला दिलेली आश्वासनं पूर्ण करण्यात यावीत अन्यथा सोमवारपासून बेमुदत उपोषण करू असा इशारा बिन्नी यांनी पक्षाला दिला होता. जनतेला दिलेली आश्वासनं पूर्ण करण्यासाठी २५ जानेवारीपर्यंत वेळ आम आदमी पक्षाला बिन्नी यांनी दिला होता. दिल्ली सरकारच्या विरोधात बिन्नी यांचं जंतरमंतर या ठिकाणी बेमुदत उपोषण आजपासून होणार आहे.
विनोद कुमार बिन्नी यांनी १६ जानेवारीला अरविंद केजरीवाल यांच्यावर पक्षाचा मुद्दा भरकटवत असल्याचा आरोप केला होता. त्यामुळं पक्षानं एका समितीची स्थापना केली होती. आपच्या अनुशासन समितीची बैठक १९ जानेवारीला पार पडली.
`आप`चे पंकज गुप्ता हे या समितीचे अध्यक्ष होते. इल्यास आझमी , आशिष तलवार, योगेंद्र यादव आणि गोपाल रॉय हे या समितीचे सदस्य होते. आम आदमी पक्षानं बिन्नींवर निलंबनाची कारवाई केली होती. आपच्या अनुशासन समितीनं बिन्नीना पक्षातून काढून टाकल्याचं जाहीर केलं.
बिन्नी यांच्यावरिल निलंबनाची कारवाई म्हणजे पक्षातील इतर बंडखोरांना संदेश आहे की आपमध्ये पक्ष विरोधी कारवाया सहन केल्या जाणार नाहीत, असंच म्हणावं लागेल.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Monday, January 27, 2014, 13:29