‘पंतप्रधानांच्या राजीनाम्याबाबत मतभेद नाहीत’, we want pm`s resignation - opposition

‘पंतप्रधानांच्या राजीनाम्याबाबत मतभेद नाहीत’

‘पंतप्रधानांच्या राजीनाम्याबाबत मतभेद नाहीत’
www.24taas.com, नवी दिल्ली
कोळसा खाण घोटाळ्यावरून पंतप्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आज सलग तिसऱ्या दिवशी विरोधकांनी गदारोळ कायम ठेवला. त्यामुळं सुरूवातीलाच दोन्ही सभागृहांचं कामकाज तहकूब करण्यात आलं. त्यानंतर काही काळ सुरु झालेलं कामकाज पुन्हा झालेल्या गोंधळानंतर दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलंय.

कॅगनं सादर केलेल्या अहवालावर सरकारनं चर्चा करण्याची तयारी दर्शवली असली तरी विरोधकांनी मात्र चर्चा करण्यास नकार देऊन राजीनाम्यावर ठाम असल्याची भूमिका घेतलीय. तर पंतप्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर एनडीएत मतभेद नसल्याचं जेडीयूचे अध्यक्ष शदर यादव यांनी स्पष्ट केलंय. तर दुसरीकडे कोंडी फोडण्यासाठी सरकारकडून जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत. राज्यसभेचे सभापती हमीद अन्सारी यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावून विरोधकांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला.

First Published: Thursday, August 23, 2012, 12:20


comments powered by Disqus