पोलिओची समजून दिली `हेपॅटायटिस बी`ची लस! West Bengal: 114 kids given Hepatitis B vaccine instead of Polio

पोलिओची समजून दिली `हेपॅटायटिस बी`ची लस, ११४ मुलं रुग्णालयात!

पोलिओची समजून दिली `हेपॅटायटिस बी`ची लस, ११४ मुलं रुग्णालयात!
www.24taas.com , झी मीडिया, हुगळी

लहान मुलांच्या लसीकरणात पुन्हा एकदा हलगर्जीपणा झालाय. पश्चिम बंगालच्या हुगळी जिल्ह्यात पल्स पोलिओच्या लसीऐवजी हलगर्जीपणानं लहान मुलांना तोंडावाटे `हेपॅटायटिस बी`ची लस दिल्यानं ११४ मुलांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.

पल्स पोलिओ दिन असल्यानं काल अनेक पालकांनी आपल्या मुलांना खाटुल (जि. हुगळी) इथल्या पोलिओ केंद्रावर डोस देण्यासाठी नेलं होतं. मात्र, पोलिओच्या डोसऐवजी मुलांना `हेपॅटायटिस बी`ची लस देण्यात येत असल्याचं पालकांपैकी एकाच्या लक्षात आलं. ही बाब त्यांनी ताबडतोब आरोग्य कर्मचारी आणि गावकऱ्यांच्या लक्षात आणून दिली. तोपर्यंत ११४ मुलांना `हेपॅटायटिस बी`ची लस देण्यात आली होती. संतप्त गावकऱ्यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांना कोंडले. स्थानिक अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन कारवाई केली.

या प्रकारामुळं संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी निदर्शनं करत आरोग्य कर्मचाऱ्यांना कोंडून ठेवलं. दरम्यान, हलगर्जीपणा करणाऱ्या सहा कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलंय.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Monday, September 16, 2013, 13:49


comments powered by Disqus