भारतात प्रवेश करायचाय तर पोलिओ लस अनिवार्य!

Last Updated: Wednesday, March 12, 2014, 14:21

१५ मार्चपासून पाकिस्तानातून भारतात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला पोलिओची लस घेतल्याचं प्रमाणपत्र देणं अनिवार्य असेल, अशी घोषणा आज भारतानं केलीय. त्यामुळे पोलिओमुक्त भारतात पुन्हा या रोगाचा शिरकाव होणार नाही.

पोलिओची समजून दिली `हेपॅटायटिस बी`ची लस, ११४ मुलं रुग्णालयात!

Last Updated: Monday, September 16, 2013, 13:49

लहान मुलांच्या लसीकरणात पुन्हा एकदा हलगर्जीपणा झालाय. पश्चिम बंगालच्या हुगळी जिल्ह्यात पल्स पोलिओच्या लसीऐवजी हलगर्जीपणानं लहान मुलांना तोंडावाटे `हेपॅटायटिस बी`ची लस दिल्यानं ११४ मुलांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.

पोलिओ लसीकरणाला विरोध; महिलांना घातल्या गोळ्या

Last Updated: Wednesday, December 19, 2012, 08:30

पाकिस्तानचं बंदरांचं शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कराचीमध्ये मंगळवारी पोलिओ लसीकरण अभियानामध्ये सहभागी झालेल्या चार महिलांची गोळ्या मारून हत्या करण्यात आलीय.

'पल्स पोलिओ'त भ्रष्टाचार, कधी घडणार 'साक्षात्कार'?

Last Updated: Sunday, July 15, 2012, 16:31

धुळे जिल्ह्यात NRHM योजनेत निकृष्ट दर्जोचे साहित्य खरेदी करुन आणि त्याचं बनावट बिल बनवून लाखो रुपयांचा भ्रष्टाचार करण्यात आलाय. यासंदर्भात वर्षभरानंतर चौकशी समिती नेमण्यात आली. मात्र या समितीतील सदस्य आणि त्यांचा कारभार पाहता हा चौकशीचा फार्स आहे का अशी शंका उपस्थित होते.