Last Updated: Monday, February 24, 2014, 19:10
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्लीकेंद्रीय गृहमंत्रालयाने राज्य सरकारला फटकारले आहे. अभिनेता संजय दत्त याला वारंवार पॅरोलची सुटी का दिली जाते? अशी विचारणा केंद्राने राज्य सरकारला केली आहे.
मुंबईतील १९९३ सालच्या बॉम्बस्फोटांत संजय दत्त दोषी असल्याने तो पुण्यातील येरवडा जेलमध्ये शिक्षा भोगतोय.
संजय दत्त याला वारंवार पॅरोलची सुटी का दिली जाते?, याबाबतचा सविस्तर अहवाल येत्या पंधरा दिवसांत केंद्राकडे सुपूर्त करावा, असे आदेशही राज्य सरकारला देण्यात आले आहेत.
संजय दत्तला आतापर्यंत चौथ्यांदा पॅरोलची सुटी देण्यात आली आहे.
कायद्याने सर्वांना समान वागणूक मिळण्याचा मुद्दा उपस्थित करत विरोधकांनी सरकारवर संजय दत्तला वारंवार दिल्या जाणाऱया पॅरोलवर कडक शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे.
कालच शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी अभिनेता संजय दत्तला एक न्याय आणि कर्नल पुरोहित, साध्वी प्रज्ञा सिंग, असीमानंद यांच्यावर कोणते गुन्हे दाखल नाहीत. तरी त्यांना अमानुषपणे का छळले जात आहे, असा सवाल उपस्थित केला होता.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Monday, February 24, 2014, 19:10