बायकोनं नवऱ्याला छतावरून फेकलं!Wife killed Husband in Haryana State

बायकोनं नवऱ्याला छतावरून फेकलं!

बायकोनं नवऱ्याला छतावरून फेकलं!
www.24taas.com, वृत्तसंस्था, जिंद, हरियाणा

अवैध संबंधासाठी एका पत्नीनं स्वत:च्या पतीला जीवे मारण्याच्या उद्देशानं छतावरून फेकलं. यामध्ये पती थोडक्यात बचावला असून त्याला गंभीर दुखापत झाली आहे. याप्रकरणी पतीनं पोलीस ठाण्यात तक्रार केली असून पोलिसांनी पत्नी, तिचा भाऊ, आई आणि तिचा प्रियकरांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.

हरयाणातील जिंद जिल्हयात राज कॉलनीमध्ये ही घटना घडली असून कुलबीर या युवकानं आपली पत्नी सोमवती हिच्यासह तिची आई नारायणी देवी, बहिण बिल्लो उर्फ बीरमती आणि तिचा प्रियकर प्रतापसिंह या सर्वांविरूध्द पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

११ वर्षांपूर्वी लग्न झालेल्या कुलबीरनं आपल्या तक्रारीमध्ये म्हटलंय की, पत्नी सोमवती आणि तिची बहिण या दोघींचे एका पोलीस असलेल्या प्रताप सिंह या व्यक्तीबरोबर अनैतिक संबंध आहेत. अनैतिक संबंधासाठी पत्नी आणि तिच्या आईनं आपल्याला छतावर बोलावलं आणि मारण्याच्या उद्देशानं छतावरून धक्का मारून फेकलं.

सुदैवानं यामध्ये आपला जीव वाचला. लग्नाच्या सुरूवातीपासून सोमवतीचं माहेरला जाणं अधिक असायचं. काही काळ याकडे दुर्लक्ष केलं पण नंतर मात्र याच गोष्टींवरून पती पत्नीत भांडण होत होतं.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, January 14, 2014, 15:31


comments powered by Disqus