`महिलांनी मर्यादा ओलांडली, तर सीताहरण होणारच`, `Women who cross Laxman-Rekha pay the price`

`महिलांनी मर्यादा ओलांडली, तर सीताहरण होणारच`

`महिलांनी मर्यादा ओलांडली, तर सीताहरण होणारच`
www.24taas.com, नवी दिल्ली

मध्यप्रदेशचे उद्योगमंत्री कैलास विजयवर्गीय यांनी दिल्ली बलात्कारावर प्रतिक्रिया देताना वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. `मर्यादा ओलांडली, तर सीताहरण होणारच`, अशी टिप्पणी त्यांनी केली आहे. महिलांनी मर्यादेत राहिलं पाहिजे, असा सल्लाच त्यांनी दिला आहे.

देशभरात महिलांच्या सुरेक्षेसाठी आणि अशा गुन्ह्यांना आळा बसावा यासाठी कायदा अंमलात आणावा यासाठी जोरदार मागणी केली जात आहे. तर दुसरीकडे मध्यप्रदेश मधील भाजपचे वरिष्ठ नेते कैलास विजयवर्गीय यांनी दिल्ली गँगरेपबाबत विवादास्पद वक्तव्य केलं आहे. आपल्या सीमा ओलांडणाऱ्या महिलांना त्याची किंमत चुकवावीच लागते. जर का महिलांनी आपली लक्ष्मण रेषा पार केली तर रावण समोर बसलेलाच आहे.

दिल्ली गँगरेपच्या घटनेनंतर अनेक नेत्यांचे विवादास्पद वक्तव्य सुरूच आहेत. आणि मध्य प्रदेशचे मंत्री विजयवर्गीय यांनी महिलांनी मर्यादेत राहण्याचा सल्ला दिला आहे. तर दुसरीकडे महिला आयोगानेही विजयवर्गीय यांच्या या वक्तव्याबद्दल निंदा केली आहे.

First Published: Friday, January 4, 2013, 13:19


comments powered by Disqus