Last Updated: Tuesday, January 8, 2013, 16:51
www.24taas.com, मुंबईआसाराम बापू यांनी दिल्ली गँगरेप पीडित मुलीबद्दल वक्तव्य करून नवा वाद ओढावून घेतला आहे. आसाराम बापूंच्या या वक्तव्याचा जनतेने निषेध केला. यामध्ये आयटम गर्ल राखी सावंतदेखील मागे नाही. तिनेही आसाराम बापूंच्या वक्तव्याची आपल्या खास शैलीत टिंगल इडवली आहे.
आसाराम बापूंच्या वक्तव्याचा निषेध करताना राखी सावंत म्हणाली, थंडी वाढल्यामुळे आसाराम बापूंच्या बुद्धीचा पारा खाली पडला आहे. आसाराम बापूंची बुद्धी भ्रष्ट झाली आहे. असंही ती म्हणाली. यापूर्वी आपण आसाराम बापूंचे भक्त होतो, मात्र आता त्यांचं वक्तव्य ऐकून मला त्यांचा खूप राग येत आहे, असं राखी म्हणाली.
आसाराम बापूंच्या आश्रमात अनेक महिला असतात. या महिलांनाही आसाराम बापू हाच सल्ला देतील का? असा सवालही राखी सावंतने केला आहे. पीडित मुलीच्या कुटुंबाला सहानुभूती देण्याऐजी साधू लोक अशी वक्तव्य करत आङेत, हे संतापजनक असल्याचं राखी म्हणाली.
अर्थात, निषेध होऊनही आसाराम बापूंनी आपली बेताल वक्तव्यं बंद केली नाहीतच. उलट, कुत्रे भुंकतच असतात. हत्तीने त्याकडे लक्ष द्यायचं नसतं. असं म्हणत आपल्या वक्तव्यांचं समर्थन केलं आहे.
First Published: Tuesday, January 8, 2013, 16:51