मोबाईलनं घेतला तरुणाचा जीव, young boy lost life in train accident in UP

मोबाईलनं घेतला तरुणाचा जीव

मोबाईलनं घेतला तरुणाचा जीव

www.24taas.com, झी मीडिया, बुलंदशहर

रेल्वेमार्गावर पडलेला आपला मोबाईल उचलण्याच्या नादात एक 18 वर्षीय तरुणानं आपला जीव गामवलाय.

उत्तरप्रदेशातील बुलंदशहर इथं ही दुर्दैवी घटना घडलीय. 18 वर्षीय विशाल सिंह एक्झिलबिशन क्रॉसिंगवरून लोहमार्ग ओलांडत असताना ही घटना घडली. रेल्वे मार्ग ओलांडताना विशालच्या हातातला मोबाईल सटकला आणि रुळांवर पडला.

फोन उचलण्याच्या नादात विशाल आजूबाजूला लक्ष न देताच खाली वाकला. समोरून येणाऱ्या खुर्जा – मेरठ पॅसेंजरकडे त्याचं लक्षच गेलं नाही... आणि बघता बघता रेल्वेनं त्याला धडक दिली. विशाला बारावीत शिकत होता.

फोन उचलण्याच्या नादात विशाल हा तरुण गाडीखाली सापडला, असं बुलंदशहर रेल्वे स्थानकाचे अधीक्षक मकबूल खान यांनी स्पष्ट केलंय. या अपघातानंतर विशालला लगेच रुग्णालयात हलवण्यात आलं होतं... पण, इथं पोहचण्यापूर्वीच त्यानं या जगाचा निरोप घेतला होता.



* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, May 9, 2014, 15:39


comments powered by Disqus