झी २४ तास गोवा मराठी फिल्म फेस्टिव्हल २८ जूनपासून!, Zee 24 Taas Goa Marathi Film Festival

झी २४ तास गोवा मराठी फिल्म फेस्टिव्हल २८ जूनपासून!

झी २४ तास गोवा मराठी फिल्म फेस्टिव्हल २८ जूनपासून!
www.24taas.com, झी मीडिया, पणजी

सहावा गोवा मराठी फिल्म फेस्टिव्हल येत्या २८ ते ३० जून दरम्यान पणजी येथे आयोजित करण्यात आला आहे. मराठीतील अग्रगणी न्यूज चॅनल झी २४ तासची या मराठी फिल्म फेस्टिवलला गेल्या ३ वर्षापासून मीडिया पार्टनर म्हणून साथ देत आहे. यंदा हा फिल्म फेस्टिव्हल आयोजित करण्यात मोलाचा वाटा उचलला आहे. त्यामुळे यंदा या फेस्टीव्हला झी २४ तास गोवा मराठी फिल्म फेस्टिव्हल म्हणून ओळखले जात आहे.

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे या तीन दिवसीय फिल्म फेस्टिव्हलचे प्रमुख पाहुणे आहेत. यावेळी मराठीती अनेक सेलिब्रिटीही उपस्थित राहणार आहे.

या महोत्सवात सुमारे १५ मराठी चित्रपट दाखविण्यात येणार आहे. हे चित्रपट कला अकादमी, मॅक्वीन्झ पॅलेस आणि आयनॉक्स थेअटरमध्ये दाखविण्यात येणार आहे.

यावेळी विनसन ग्राफीक्सने शॉर्ट फिल्म स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यात गोव्यातील चित्रपट निर्मात्यांना प्रोत्साहन देण्याच प्रयत्न आहे. यावेळी महिला दिग्दर्शकाचे चर्चासत्रही आयोजित करण्यात येणार आहे. यात गौरी शिंद, किरण राव, मृणाल कुलकर्णी आणि इतर सहभागी होणार आहे. यात त्याचे चित्रपट आणि चित्रपट निर्मिती प्रवास उलगडणार आहे.

यावेळी ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचा त्याच्या अभिनय क्षेत्रातील योगदानबद्दल पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे.

हा कार्यक्रम झी २४ तास सह वामन हरी पेठे ज्वेलर्स प्रस्तुत करीत आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Tuesday, June 25, 2013, 20:54


comments powered by Disqus