गोवा मराठी चित्रपट महोत्सवाला शानदार सुरूवात

Last Updated: Saturday, June 29, 2013, 15:17

चंदेरी दुनियेचा मानबिंदू समजल्या जाणाऱ्या सहाव्या झी 24 तास गोवा मराठी चित्रपट महोत्सवाला पणजीत शानदार सुरूवात झाली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत या सोहळ्याला सुरुवात झाली. महोत्सवाला मराठी कलाक्षेत्रातली मान्यवर मंडळी उपस्थित होते.

झी २४ तास गोवा मराठी फिल्म फेस्टिव्हल २८ जूनपासून!

Last Updated: Tuesday, June 25, 2013, 20:54

सहावा गोवा मराठी फिल्म फेस्टिव्हल येत्या २८ ते ३० जून दरम्यान पणजी येथे आयोजित करण्यात आला आहे. मराठीतील अग्रगणी न्यूज चॅनल झी २४ तासची या मराठी फिल्म फेस्टिवलला गेल्या ३ वर्षापासून मीडिया पार्टनर म्हणून साथ देत आहे. यंदा हा फिल्म फेस्टिव्हल आयोजित करण्यात मोलाचा वाटा उचलला आहे. त्यामुळे यंदा या फेस्टीव्हला झी २४ तास गोवा मराठी फिल्म फेस्टिव्हल म्हणून ओळखले जात आहे.