`नवख्या खेळाडूंना कमकुवत समजण्याची चूक नको` ,rohit sharma on india vs australia t 20 series

`नवख्या खेळाडूंना कमकुवत समजण्याची चूक नको`

`नवख्या खेळाडूंना कमकुवत समजण्याची चूक नको`
www.24taas.com, झी मीडिया, राजकोट

भारतीय दौऱ्यावर आलेल्या ऑस्ट्रेलियन टीमला कमकुवत समजून चालणार नाही, असं मत बॅट्समन रोहित शर्माने व्यक्त केलंय.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या दोन दमदार टीम्समध्ये उद्यापासून (गुरुवारपासून) टी-२० मॅचला सुरुवात होतेय. याविषीय बोलत असताना, ‘कांगारुंच्या टीममध्ये टॅलेंटेड प्लेअर्स असून आयपीएल आणि चॅम्पियन्स लीगदरम्यान भारतात खेळण्याचा अनुभव त्यांनी घेतलेला आहे. यामुळेच भारतातील हवामानाबाबत त्यांना चांगलीच माहिती आहे. ऑस्ट्रेलियीन टीम ही नेहमीच धोकादायक टीम असते असंही रोहीतनं म्हटलंय. ऑस्ट्रेलियन टीम ही आव्हानात्मक असून त्यांच्याकडे मॅचन विनर्स बॅट्समन असल्याचही रोहित म्हणाला.

उद्यापासून सुरू होणाऱ्या या सीरीजमध्ये युवराज सिंह कमबॅक करतोय. भारतानं आपले दमदार खेळाडू या मॅचसाठी मैदानात उतरवले असले तर ऑस्ट्रेलियाच्या टीममधील बहुतांशी खेळाडू नवखे आहेत. इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या अॅशेस श्रृंखलेअगोदर ऑस्ट्रेलिया आपल्या युवा खेळाडूंना आजमावणार आहे. परंतु, या मॅचवर पावसाचं सावट मात्र कायम आहे.

First Published: Wednesday, October 9, 2013, 16:25


comments powered by Disqus