मंगळावर जाण्यासाठी १ लाख लोकांचे अर्ज..., 1,00,000 people apply for `one-way ticket` to Mars to never return to E

मंगळावर जाण्यासाठी १ लाख लोकांचे अर्ज...

मंगळावर जाण्यासाठी १ लाख लोकांचे अर्ज...
www.24taas.com , झी मीडिया, वॉशिंग्टन

मंगळावर जाण्यासाठी आतापर्यंत १ लाख लोकांचे अर्ज आले आहेत. कोट्यावधी डॉलर खर्चून या लाल ग्रहावर राहायला जाण्यासाठी हे अर्ज आले आहेत. ‘द मार्स वन’ नावाच्या या योजनेची सुरुवात २०२२ मध्ये होणार आहे.

मंगळावर माणूस जिवंत राहू शकतो की नाही, हे अजून स्पष्ट झालं नाहीय. तरी सुद्धा मोठ्या संख्येनं मंगळावर राहण्यासाठी लोक उत्सुक दिसतायेत.

‘मार्स वन’चे सीईओ आणि सहसंस्थापक बैस लॅन्सड्रॉप म्हणाले, “कित्येक लोकांनी या मोहिमेसाठी अर्ज दाखल केले आहेत, तर अजून अनेक लोक यासाठी तयार आहेत”. मात्र आतापर्यंत किती लोकांनी फी भरली हे बैस यांनी सांगितलं नाही.
अर्ज करण्यासाठीची वयोमर्यादा १८ वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त आहे. मात्र फी अर्जदाराच्या नागरिकत्वावर अवलंबून आहे. एका चॅनलच्या बातमीनुसार अमेरिकेतल्या नागरिकांना अर्ज करण्यासाठीची फी ३८ डॉलर इतकी आहे.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, August 14, 2013, 13:04


comments powered by Disqus