Last Updated: Wednesday, August 28, 2013, 16:41
www.24taas.com, झी मीडिया, मेलबर्नऑस्ट्रेलियामध्ये लैंगिक शोषणाची एक वेगळीच घटना समोर आली आहे. मेलबर्न शहरात एका १० वर्षीय अल्पवयीन मुलीला ४ वर्षीय मुलाचं लैंगिक शोषण केल्याबद्दल अटक करण्यात आलं.
मेलबर्न येथे ४ वर्षांचा छोटा मुलगा १० वर्षीय मुलीसोबत ‘डॉक्टर डॉक्टर’ खेळत होता. यावेळी १० वर्षीय मुलीने ४ वर्षीय मुलाचं लैंगिक शोषण केलं. KRIV-TV या अपार्टमेंटमध्ये काही शेजारची मुलं एकत्र खेळत होती. यावेळी १० वर्षीय मुलगी एश्ले ४ वर्षीय मुलीला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करत होती. तसंच तिने मुलाच्या मनाविरुद्ध त्याच्या गुप्तांगांना स्पर्श केला. याबद्दल तिला शिक्षाही करण्यात आली.
पोलिसांनी ४५ मिनिटं एश्लेची चौकशी कऱण्यात आली. यावेळी तिच्या आईलाही तिच्याजवळ बसू दिलं नाही. एश्ले चौकशी चालू असताना खूप घाबरली होती. ती सतत रडत होती. मात्र एश्लेला अटक करण्यात आलं आणि गुन्हा सिद्ध झाल्यावर तिला हॅरिस काऊंटी येथील जुविनाईल डिटेंशन सेंटरमध्ये ४ दिवस ठेवण्यात आलं.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Wednesday, August 28, 2013, 16:41