सीरियाच्या यादवीत १०,००० लहानग्यांचा बळी - यूएन

Last Updated: Thursday, February 6, 2014, 16:24

देशात सैनिकांकडून लहान मुलांचा अनन्वित छळ होत असल्याच्या वृत्ताला सीरिया सरकारनं नेहमीच नकार दिलाय. `यूएन`च्या अहवालानं मात्र या वृत्ताला दुजोरा दिलाय. सीरियामध्ये सुरू असलेल्या सरकार आणि विरोधात यांच्या यादवी संघर्षात लहान मुलांना बळी दिलं जातंय, हे या अहवालातून धडधडीतपणे समोर आलंय.

१० वर्षीय मुलीने केलं ४ वर्षीय मुलाचं लैंगिक शोषण

Last Updated: Wednesday, August 28, 2013, 16:41

ऑस्ट्रेलियामध्ये लैंगिक शोषणाची एक वेगळीच घटना समोर आली आहे. मेलबर्न शहरात एका १० वर्षीय अल्पवयीन मुलीला ४ वर्षीय मुलाचं लैंगिक शोषण केल्याबद्दल अटक करण्यात आलं.

अनेक वर्षं झालं होतं माझं लैंगिक शोषण- अनुष्का शंकर

Last Updated: Wednesday, February 13, 2013, 16:37

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये जगाचा निरोप घेणाऱ्या जगप्रसिद्ध सितारवादक रविशंकर यांची मुलगी अनुष्का शंकर हिने एक खळबळजनक खुलासा केला आहे. आपल्यावर अनेक वर्षं लैंगिक शोषण झाल्याचं अनुष्का शंकर हिने सांगितलं. ३१ वर्षीय सितारवादक अनुष्काने व्हॅलेंटाइन्स डे निमित्त अरब महिलांना घराबाहेर पडण्याचा संदेश दिला. हा संदेश देताना अनुष्काने वरील खुलासा केला आहे.

अखेर बेबी फलकचा 'एम्स'मध्ये मृत्यू

Last Updated: Friday, March 16, 2012, 07:57

गेले दोन महिने ‘एम्स’मध्ये मृत्यूशी लढत असणाऱ्या बेबी फलकचं अखेर निधन काल रात्री निधन झालं. बेबी फलक केवळ २ वर्षांची होती. फलकचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यामुळे झाल्याचं फलकवर उपचार करत असणाऱ्या डॉक्टरांनी सांगितलं.

पाच वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार

Last Updated: Saturday, October 29, 2011, 11:04

मुंबईत गोरेगावमध्ये बलात्कार करून खुनाची घटना उघडकीस आली आहे. आरोपीनं आपल्या घरामध्येच अल्पवयीन मुलीचा मृतदेह लपवला होता. शेजाऱ्यांना घटना कळताच त्यांनी आरोपीला बेदम मारहाण करुन पोलिसांच्या हवाली केलं.