१०८ व्या वर्षी प्रताप, अकराव्यांदा बनला बाप! 108-year-old Iranian man becomes father for 11th time

१०८ व्या वर्षी प्रताप, अकराव्यांदा बनला बाप!

१०८ व्या वर्षी प्रताप, अकराव्यांदा बनला बाप!
www.24taas.com, झी मीडिया, बगदाद

इराणमध्ये एक १०८ वर्षीय वृद्ध माणूस पिता बनला आहे. तो ही अकराव्यांदा पिता बनला आहे. गंमत म्हणजे या माणसाचा सर्वांत पहिला मुलगाच आता ८० वर्षांचा आहे.

आज या १०८ वर्षीय म्हाताऱ्याची मुलं, नातवंडं, पणतू, खापर पणतू मिळून शंभरजणांचा परिवार आहे. अशावेळी हा इसम पुन्हा एकदा बाप बनला आहे. त्याला पहिल्या पत्नीकडून ९ मुलं तर दुसऱ्या पत्नीकडून २ मुलं झाली आहेत.

आपल्या दीर्घायुष्याचं तसंच आयुष्याची शंभरी पार केल्यानंतरही बाप बनण्याचं श्रेय आपल्या जीवनशैलला देतो. मेहनत, उत्तम आहार, आनंदी स्वभाव आणि ताणविरहीत जीवन यामुळेच माणसाचं आयुर्मान वाढतं तसंच शक्तीही कायम राहाते, असं या माणसाचं म्हणणं आहे. आजही आपण कुठल्याही प्रकारचं औषध घेत नसल्याचं या माणसाने अभिमानाने सांगितलं आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Monday, July 22, 2013, 18:02


comments powered by Disqus