६१ टक्के सूनांकडून सासू-सासऱ्यांवर अत्याचार

Last Updated: Tuesday, June 17, 2014, 21:52

एकीकडे महिलांवरील अत्याचारात वाढ होत असताना, देशातील वृध्दांची स्थितीही फारशी चांगली नाही, हेच वास्तव `हेल्पेज इंडिया`च्या सर्वेमध्ये पुढे आलंय. वृध्दांवरील अत्याचारांचं गेल्यावर्षीचं २३ टक्क्यांवर असलेलं प्रमाण 2014 मध्ये ५० टक्क्यांपर्यंत म्हणजे दुपटीहून अधिक वाढलंय.

दुर्देवी घटना: उष्माघात आणि अन्न-पाण्याविना त्यांनी सोडले प्राण

Last Updated: Tuesday, June 10, 2014, 19:12

नागपूरमध्ये उष्माघातानं संपूर्ण कुटुंबाचाच बळी घेतल्याचं निष्पन्न झालंय. ६७ वर्षांचे रशीद मोहम्मद आणि त्यांच्या ६३ वर्षांच्या पत्नी बिल्कीस बानो यांचा मृत्यू झालाय. रशीद मोहम्मद यांचा ३ दिवसांपूर्वी उष्माघातानं मृत्यू झाला होता. त्यांच्या पत्नी या नेत्रहीन असून अथंरूणाला खिळल्या होत्या. रशीद यांच्या मृत्यूनंतर उपासमारीनं त्यांचा मृत्यू झाला.

जगातील सर्वात वयोवृद्ध व्यक्तीचं १११ व्या वर्षी निधन

Last Updated: Monday, April 28, 2014, 20:34

जगातील सर्वाधिक वयोवृद्ध पुरुष अशी अधिकृतपणे मान्यता मिळालेले अतरुरु लिकाटा यांचं नुकतचं निधन झालं, गिनीज वर्ल्ड रेकॉर्डस्ने हे जाहीर केलं आहे. लिकाटा हे इटलीत रहात होते.

६३ वर्षांच्या व्यापाऱ्याच्या पोटात १२ सोन्याची बिस्किटे

Last Updated: Saturday, April 19, 2014, 09:23

सिंगापूरमधून भारतात परतणाऱ्या एका वृद्ध व्यापाऱ्याच्या पोटातून चक्क 12 सोन्याची बिस्किटे काढण्यात आली आहे. दिल्लीमध्ये डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून ही बिस्किटे बाहेर काढलीत.

चक्क आजीच्या डोक्यावर उगवले शिंग

Last Updated: Tuesday, April 8, 2014, 18:54

चीनमध्ये अशी एक वृद्ध महिला आहे की, ती चर्चेचा विषय झाली आहे. चक्क तिच्या कपाळावरच शिंग उगवले आहे. ही महिला 101 वर्षांची आहे. मात्र, हा राक्षस प्रकार असल्याचा काहींचे म्हणणे आहे.

सुनेच्या जाचाला कंटाळून वृद्ध दाम्पत्याची आत्महत्या

Last Updated: Sunday, March 16, 2014, 23:59

सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील बासुंबे गावात, मुलाच्या आणि सुनेच्या जाचाला कंटाळून वृद्ध दांपत्याने आत्महत्या केली.

६० वर्षीय नराधमाचा चिमुरडीवर बलात्कार, मुलगी गरोदर

Last Updated: Monday, February 17, 2014, 16:54

एका ६० वर्षीय नराधमाने बारा वर्षीय मुलीवर मीरारोडमध्ये वारंवार अत्याचार केल्याची घटना मागील रविवारी ठाण्यात उघडकीस आली.

तरण्या प्रेयसीसाठी म्हाताऱ्या प्रियकरांची `फायटिंग`!

Last Updated: Wednesday, February 5, 2014, 11:27

`तो` आपल्या तरण्या प्रेयसीवर लाईन मारतो म्हणून म्हणून एका ८० वर्षाच्या वृद्धानं ६५ वर्षीय वृद्धावर सुरा आणि कात्रीनं प्राणघातक हल्ला केला. ही घटना सिंगापूरमध्ये घडलीय.

अल्पवयीन मुलानं केला ६२ वर्षीय महिलेवर बलात्कार

Last Updated: Sunday, January 12, 2014, 14:43

देशाची मान शरमेनं खाली घालणाऱ्या अनेक घटना सध्या दररोज आजुबाजुच्या परिसरात घडतांना दिसतायेत. मिळालेल्या माहितीनुसार एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलानं आपल्या आजीच्या वयाच्या असलेल्या ६२ वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याची घटना घडलीय.

अॅसिड टाकून वृद्ध दाम्पत्याची हत्या

Last Updated: Monday, January 6, 2014, 15:56

श्रीगोंदे तालुक्यातील पिंपळगाव पिसा शिवारातील कुकडी कालव्याजवळ राहणारे रंगनाथ गणपत भोसले (७०), सरस्वती रंगनाथ भोसले (६५) या वृद्ध शेतकरी जोडप्याची अॅसिड टाकून क्रूरपणे हत्या करण्यात आली आहे.

मुंबईकरांनो सावधान... वृद्धांना गंडा घालवणारी टोळी सक्रिय

Last Updated: Friday, January 3, 2014, 22:58

मुंबईतल्या ज्येष्ठ नागरिक आणि वृद्धांनो सावधान...सध्या वृद्धांना गंडा घालणारी एक टोळी मुंबईत सक्रिय झालीय. असंच एक धक्कादायक फुटेज आमच्या हाती लागलंय.

एक राज्य... जिथं ३२,००० पेक्षा जास्त लोकांनी ओलांडलीय वयाची सेन्चुरी

Last Updated: Wednesday, January 1, 2014, 11:14

आपल्या वयाची सेन्चुरी पूर्ण करणाऱ्यांची केवळ मध्यप्रदेशातील संख्या ३२ हजारांहून जास्त असल्याचं पुढे आलंय. महत्त्वाचं म्हणजे, २००१ ते २०११ या दशकाच्या कालावधीत वयाची शंभर वर्ष पूर्ण करणाऱ्यांची संख्या जवळजवळ चार पटींनी वाढलीय.

ब्रिटिश तरुणीचा शीख वृद्धावर हल्ला

Last Updated: Monday, August 19, 2013, 09:31

लंडनमध्ये १९ वर्षीय ब्रिटीश युवतीनं एका ८० वर्षीय शीख वयोवृद्धास बेदम मारहाण केल्याचा प्रकार घडलाय. मारहाणीत शीख गृहस्थ गंभीर जखमी झाला असून युवतीला पोलिसांनी ताब्यात घेतलंय.

हा कसला नियम...

Last Updated: Monday, August 5, 2013, 11:21

धोतर घालून मेट्रो रेल्वे स्थानकात गेलेल्या एका वृध्द भारतीयाला मेट्रोतून प्रवास करण्यापासून रोखल्याचा प्रकार दुबईत घडला.

१०८ व्या वर्षी प्रताप, अकराव्यांदा बनला बाप!

Last Updated: Monday, July 22, 2013, 18:02

इराणमध्ये एक १०८ वर्षीय वृद्ध माणूस पिता बनला आहे. तो ही अकराव्यांदा पिता बनला आहे. गंमत म्हणजे या माणसाचा सर्वांत पहिला मुलगाच आता ८० वर्षांचा आहे.

...तर मुलांच्या शिक्षणावरचा खर्च व्याजासकट घ्या!

Last Updated: Thursday, July 18, 2013, 19:59

एखाद्या मुलाने आपल्या आई वडिलांना त्रास दिल्यास त्या मुलाच्या शिक्षणावर केलेला खर्च व्याजासकट वसून केला जावा अशी मागणी शिवसेनेने केली आहे. यासाठी कायद्यात सुधारणा करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेच्या डॉ. दीपक सावंत यांनी केली आहे.

९२ वर्षीय वृद्धाचा २२ वर्षीय तरुणीशी विवाह

Last Updated: Monday, July 8, 2013, 13:03

नातवांचं आणि आजोबांचं लग्न एकाच मांडवात... होय, हे खरं आहे. बगदादमध्ये ही अशक्य वाटणारी गोष्ट घडलीय. हे आजोबा शेतकरी आहेत.

६० व्या वर्षी दिला बाळाला जन्म, डॉक्टरही चक्रावले!

Last Updated: Friday, June 14, 2013, 17:18

इंदौरमध्ये एक आश्चर्यजनक घटना घडलीय. नैसर्गिकरित्या गर्भधारणा होऊन एका ६० वर्षीय महिलेनं एका बाळाला जन्म दिलाय. आश्चर्य वाटतयं ना? पण हे खरचं घडलयं.

जगातील सर्वांत वृद्ध पुरूषाचं निधन

Last Updated: Wednesday, June 12, 2013, 17:12

जपानमध्ये राहाणारे जगातील सर्वात वृद्ध नागरिक जिरोउमन किमुरा यांचे आज निधन झालं. ते ११६ वर्षांचे होते. काही महिन्यांपूर्वीच त्यांना ‘जगातील सर्वांत जास्त जगणारे पुरूष’ हा सन्मान मिळाला होता.

धनसंपत्ती वृद्धीसाठी करा हे उपाय

Last Updated: Saturday, June 8, 2013, 08:42

धनसंपत्ती वृद्धीसाठी आपण नेहमीच प्रयत्नशील असतो. पुढील काही गोष्टी लक्षात घेतल्यास याचा नक्कीच फायदा होईल.

९० वर्षीय बापाला साखळदंडानं ठेवलं बांधून!

Last Updated: Thursday, June 6, 2013, 15:17

एका ९० वर्षीय वृद्धाला बंगल्याच्या गच्चीवर साखळदंडानं गेल्या कित्येक दिवसांपासून बांधून ठेवण्यात आलं होतं... हा पराक्रम करणारा दुसरा-तिसरा कुणी नव्हता तर या वृद्धाचा मुलगाच होता

माजी कामगार मंत्री साबीर शेख अखेर वृद्धाश्रमात

Last Updated: Monday, January 21, 2013, 18:54

माजी कामगारमंत्री आणि शिवसेना नेते साबीर भाई शेख यांना अखेर औरंगाबादच्या वृद्धाश्रमात हलवण्यात आलंय.

जगातील सर्वांत म्हाताऱ्या आजीबाईंचं निधन

Last Updated: Sunday, January 13, 2013, 15:20

जगातील सर्वात म्हाताऱ्या महिलेचं निधन झाल्याची बातमी जपानच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आली आहे. जपानमधील कोतो ओकुबो या ११५ वर्षांच्या आजीबाई जगातील सर्वांत वृद्ध महिला होत्या.

पौरुषत्व वाढवण्यासाठी खा हे पदार्थ

Last Updated: Thursday, December 13, 2012, 16:26

आजच्या धावपळीच्या काळात अस्वस्थता, टेन्शन्स यांचा परिणाम शरीरावर होत असतो. काही वेळा शरीर वरकरणी धडधाकट वाटत असलं, तरी एक प्रकारची कमजोरी आली असते. या गोष्टींचे परिणाम पौरुषत्वावरही होत असतात. आपलं पौरुषत्व वाढवण्यासाठी, वीर्यवृद्धीसाठी आयुर्वेदात काही सोपे उपाय सांगितले आहेत. सोप्या घरगुती उपयांनी हे विकार दूर करता येऊ शकतात.

जगातील सर्वात वयोवृद्ध महिलेचं निधन...

Last Updated: Thursday, December 6, 2012, 11:56

‘जगातील सर्वात वयोवृद्ध व्यक्ती’ म्हणून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदल्या गेलेल्या बेसी कूपर यांचं निधन झालंय. मृत्यूसमयी त्यांचं वय होतं ११६ वर्ष...

मारहाणप्रकरणी मनसे नगरसेवकावर गुन्हा

Last Updated: Sunday, December 2, 2012, 11:19

कल्याण-डोंबिवली महापालिकेत ठेकेदाराला मारहाण केल्याप्रकरणी मनसे नगरसेवक नितीन निकम यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मनसे नगरसेवकाचा प्रताप, वयोवृद्ध ठेकेदाराला मारहाण

Last Updated: Saturday, December 1, 2012, 23:59

संतापाच्या भरात लोकप्रतिनिधी कोणत्या थराला जाऊ शकतात याचं उत्तम उदाहरण कल्याण-डोंबिवली महापालिकेत पहायला मिळावलं.

अभिनेते प्राण रुग्णालयात

Last Updated: Monday, November 19, 2012, 19:01

बॉलिवूडमधील खलनायकांच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध असलेले ज्येष्ठ अभिनेते प्राण यांना प्रकृती खालावल्यामुळे लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

भाडेकरू ठेवणं वृद्ध दाम्पत्याच्या जीवावर बेतलं

Last Updated: Wednesday, July 11, 2012, 14:09

औरंगाबादमध्ये एका वृद्ध दाम्पत्याला स्वत:च्याच घरात डांबण्याचा खळबळजनक प्रकार समोर आलाय. या वृद्ध दाम्पत्याला घरात कोंडणारा दुसरा-तिसरा कोणी नसून हा त्यांचाच भाडेकरू आहे.

वृद्धाचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार

Last Updated: Thursday, June 14, 2012, 15:46

औरंगाबादमधील अर्धापूर येथे माणूसकिला काळिमा फासणारी एक घटना घडली आहे. एक वृद्धाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला आहे. एका ६० वर्षीय वृद्धाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा प्रकार उघड झाला आहे.

'वृद्धांचे आरोग्याबरोबर राहणीमान सुधारणार'

Last Updated: Saturday, April 7, 2012, 20:32

आज जागतिक आरोग्य दिन जगभर साजरा केला जातोय. ६ एप्रिल १९५० पासून जागतिक आरोग्य दिनास सुरुवात झालीय. यंदा 'निर्मय वार्धक्य आयुष्यमान भव' हे घोषवाक्य जागतिक आरोग्य संघटनेच आहे. पुढील एक वर्ष जागतिक आरोग्य संघटना वृद्धांचे राहणीमान सुधारण्यासाठी कार्य करणार आहे.

आर्धापूर कोर्टाची कौतुकास्पद शिक्षा !

Last Updated: Friday, February 10, 2012, 08:44

नांदेड जिल्ह्यातील आर्धापूर न्यायालायाने दिलेला निर्णय कौतुकाचा विषय ठरला आहे. न्यायालयाने सामाजिक बांधिलकी जपत एका मारहाणीच्या प्रकरणात आरोपीला वृध्दाश्रमात वृध्दाची सेवा करण्याची शिक्षा सुनावली आहे.