Last Updated: Tuesday, October 30, 2012, 08:11
www.24taas.com, माद्रिदहिवाळ्याची चाहूल लागताच स्पेनमधील हजारो मेढ्यांनी मैदानी भागाकडे कुच केली. राजधानी माद्रिदच्या रस्त्यांवर मेंढ्यांचे लोंढे पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. वाहतुकीला मेढ्यांचा अडथळा होऊ नये म्हणून वाहतुकीची विशेष व्यवस्था करण्यात आली होती.
वाढत्या शहरीकरणामुळे जुनी कुरणं वाचवण्यासाठी हिवाळ्याच्या काळात मध्य माद्रिदमध्ये २००० मेंढ्यांचं संचलन झालं. ही प्रथा १२७३ पासून चालत आलेली आहे. जेव्हा माद्रिद हे लहानसं खेडं होतं आणि वाढत जाऊन आज स्पेनची राजधामी बनली आहे.
दरवर्षी आपल्या अधिकारांचं रक्षण करण्यासाठी आणि शहरी लोकांना आठवण करून देण्यासाठी गावातले धनगर मेंढ्यांना राजधानीत घेऊन येतात. या मेंढीपाळांना आपल्या मेंढ्यांच्या स्थलांतरासाठी १,२५,००० किमीचा रस्ता वापरण्याचा अधिकार असतो. या परंपरेला स्पेनमध्ये ‘ट्रान्शुमान्स’ असं म्हटलं जातं.
First Published: Tuesday, October 30, 2012, 08:11