रॉजर फेडररला झाली दुसऱ्यांदा जुळी मुलं!

Last Updated: Thursday, May 8, 2014, 10:31

टेनिसपटू रॉजर फेडरर दुसऱ्यांदा जुळ्या मुलांचा पिता झालाय. त्याची पत्नी मिर्का हिनं दुसऱ्यांदा जुळ्यांना जन्म दिला. दोन्ही मुलं असून त्यांची नावं लिओ आणि लेनी अशी आहेत. चार वर्षांपूर्वी मिर्काला मायला रोझा आणि चार्लीन रिव्हा या जुळ्या मुली झाल्या. फेडररनं ‘ट्‌वीटर`द्वारं ही ‘गुड न्यूज` दिली.

मेंढ्यांचे लोंढे राजधानीकडे!

Last Updated: Tuesday, October 30, 2012, 08:11

हिवाळ्याची चाहूल लागताच स्पेनमधील हजारो मेढ्यांनी मैदानी भागाकडे कुच केली. राजधानी माद्रिदच्या रस्त्यांवर मेंढ्यांचे लोंढे पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. वाहतुकीला मेढ्यांचा अडथळा होऊ नये म्हणून वाहतुकीची विशेष व्यवस्था करण्यात आली होती.