24tas.com- terrorist attack on pak air base

पाकमधील एअरबेसवर दहशतवादी हल्ला

पाकमधील  एअरबेसवर दहशतवादी हल्ला

www.24taas.com, इस्लामाबाद

पाकिस्तानातल्या एअरबेसवर दहशतवादी हल्ला झाला. पंजाब प्रांतातील कामरा एअरबेसवर दहशतवाद्यांनी हा हल्ला केलाय. पंजाब प्रांतातील कामरा हे पाकिस्तानी लष्कराचे महत्त्वपूर्ण विमानतळ आहे. रात्री २ वाजण्याच्या सुमारास हा हल्ला झालाय. पाक सैनिकांच्य वेशात १० दहशतवादी एअरबेसमध्ये घुसल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय.

दरम्यान पाक सैनिक आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत बहुतेक सर्व दहशतवादी मारले गेल्याचं जियो टीव्हीनं म्हटलंय. पाक सैन्य दलानं या परिसराला घेरलंय.

बुधवारी मध्यरात्री २ च्या सुमारास दहा दहशतवादी पाकिस्तान लष्कराच्या वेषात कामरा विमानतळात घुसले आणि त्यांनी हल्ला चढविला. पाकिस्तानी लष्कर सेना व दहशतवादी यांच्यात सुमारे तीन-चार तास चकमक झाली. यात ६ दहशतवादी ठार झाले आहेत. यामध्ये एका दहशतवाद्याचा मृतदेह हाती लागला आहे तर पाकिस्तानी लष्करातील एकजण या चकमकीत शहीद झाला आहे.

First Published: Thursday, August 16, 2012, 08:51


comments powered by Disqus