Last Updated: Tuesday, March 25, 2014, 17:39
www.24taas.com, झी मीडिया, न्यू यॉर्कचार फुटांच्या अमांडा लॉय हिने गेल्या आठवड्यात पहिल्यांदा बॉडी बिल्डिंग स्पर्धेत भाग घेतला आणि जेव्हा ती स्पर्धा जिंकली त्यावेळी हॉलमध्ये उपस्थित असलेल्या प्रत्येकांने टाळ्यांच्या कडकडाटाने तिचे अभिनंदन केले.
अमांडा चार फुटाची असून तिचे वजन ३२ किलो आहे. तिला जन्मापासून हायपोकोन्ड्रोप्लासिया हा आजार आहे. या आजारात व्यक्तीची उंची वाढत नाही. आयुष्यभर या व्यक्तिची उंची कायम कमीच राहते. अमांडा आपल्या शरिराबद्दल बोलताना सांगितले, की हे असे आहे की एक सामान्य शरीर एका छोट्या पाकीटात अकुंचन पावले आहे.
अनेक महिन्यांच्या कठोर परिश्रमानंतर अमांडाने गेल्या आठवड्यात अरिझोनाच्या मेसा येथे नॅचरल वेस्टर्न यूएसए फिगर स्पर्धेत भाग घेतला. बिकनी आणि हिल्स घातलेली अमांडा इतर स्पर्धकांप्रमाणेच दिसत होती. तिला प्रोत्साहन देण्यासाठी तिचे कुटुंबिय उपस्थित होते. जेव्हा ती स्टेजवर आली त्यावेळी ती सर्वांच्या पसंतीला उतरली. आपल्या छोट्या अंगकाठीनेही अमांडाने परीक्षकांना प्रभावित केले. तिच्या गटात एकूण ९ प्रतिस्पर्धी होते. तिचा चौथा क्रमांक आला. तिने आपल्या घरी चमचमणारी ट्रॉफी घेऊन गेली.
नर्सिंगचा कोर्स करणाऱ्या २२ वर्षाची अमांडाने सांगितले की, कमी उंची असलेली मी प्रथम महिला आहे जीने बॉडी बिल्डिंग स्पर्धेत भाग घेतला.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Tuesday, March 25, 2014, 17:39