Last Updated: Thursday, June 6, 2013, 11:04
www.24taas.com, झी मीडिया, टोकिओजपानमध्ये ताशी तब्बल ५०० किलोमीटर वेगानं जाणाऱ्या रेल्वेची यशस्वी चाचणी घेण्यात आलीये. मॅग्नेटिक लेव्हिटेटिंग म्हणजे चुंबकीय बलाचं तंत्रज्ञान या गाडीसाठी वापरण्यात आलंय.
`मॅगलेव्ह` हे या ट्रेनचं नाव तंत्राला साजेसं असंच ठेवण्यात आलंय. नुकत्याच झालेल्या या चाचणीसाठी ५ डब्यांची गाडी सोडण्यात आली होती. मात्र अंतिमतः जेव्हा प्रत्यक्षात वाहतूक सुरू होईल, तेव्हा तिला १६ डबे असतील, असं सेंट्रल जपान रेल्वेच्या अधिका-यांनी म्हटलंय.
प्रवासी वाहतूकीसाठी वापरली जाणारी ही सर्वात जलद ट्रेन ठरणार आहे. या चाचणीचं यश तमाम भारतीयांसाठीही महत्त्वाचं ठरणार आहे. कारण जपान भारतात हाय स्पीड ट्रेनसाठी करार करण्याच्या प्रयत्नात आहे. असा एखादा करार झाल्यास या नव्या तंत्रज्ञानाचा फायदा आपल्याला होऊ शकतो.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Thursday, June 6, 2013, 11:04