Last Updated: Wednesday, August 28, 2013, 19:23
www.24taas.com, झी मीडिया, न्यूयॉर्कन्यूयॉर्क पोलिसांनी शहरातील सर्व मशिदींना गोपनीय पद्धतीने दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलं आहे. याचा परिणाम म्हणजे पोलिसांना मशिदीत चालणाऱ्या धार्मिक चर्चा, धार्मिक शिकवण्या रेकॉर्ड करण्याचा अधिकार मिळेल. तसंच कुठल्याही इमामाची हेरगिरी करण्याची सूटही मिळेल.
९/११ ची घटना घडल्यापासून अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर मुस्लिम विरोधी वातावरण आहे. या घटनेनंतर न्यूयॉर्क पोलिसांनी मशिदींबरोबरच कमीत कमी ११ ठिकाणांची तपासणी केली. या तपासणीला टेररिझन इंटरप्रायजेस इनव्हेस्टिगेशन म्हटलं जातं.
मशिदींना दहशतवादी संघटना घोषित केल्यावर पोलीस मशिदीतील कुठल्याही व्यक्तीला पुराव्यांविना संशयित म्हणून अटक करू शकतात. मशिदींत नमाज पढणाऱ्यांवरही संशयाची सुई जाणार आहे.
या प्रकारामुळे न्यूयॉर्कमधील मुस्लिमांमध्ये नाराजीची भावना आहे. निर्दोष मुस्लिमांची मुस्कटदाबी होत असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र न्यूयॉर्क पोलीसांनी मात्र याविषयी कुठलंही अधिकृत वक्तव्य देण्यास नकार दिला आहे.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Wednesday, August 28, 2013, 19:22